शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभाग टसर-रेशीम उत्पादनाचे हब

By admin | Updated: March 9, 2017 02:27 IST

नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे.

महिलांसाठी रोजगाराच्या संधी : पाच कोटी रेशीम कोशाचे उत्पादन नागपूर : नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे. देशात टसर उत्पादनामध्ये राज्याचा १० वा क्रमांक लागतो. विभागात महिलांनी पाच कोटी रेशीम कोश उत्पादन घेतले आहे. या टसर कोश उत्पादनासोबतच धागा तयार करणे आणि कापडापर्यंतची प्रक्रिया निर्माण झाल्यास शेतीनंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत. नागपूर विभागात असलेल्या वनसंपदेच्या आधारावर १० कोटीपर्यंत रेशीम कोश उत्पादन घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी भंडारा, आंधळगाव, किटाळी, खडसंगी आदी भागात सामूहिक टसर कोश प्रक्रिया केंद्र सुरू करण्याला चालना मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय रेशीम बोर्ड तसेच राज्य हातमाग संचालनालयातर्फे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विशेषत: नागपूर विभागात सरासरी ३०० मेट्रिक टन टसर-रेशीम उत्पादन होत असून, संपूर्ण देशात २९ हजार मेट्रिक टन उत्पादन होत असल्यामुळे नागपूर व अमरावती विभागात शेतीसोबतच रेशीम व टसर उत्पादनाला भरपूर संधी उपलब्ध आहेत. या उत्पादन प्रक्रियेसाठी मुद्रा बँकेचाही सहभाग लाभल्यामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केंद्र सुरू होण्यात मदतच होत आहे. रेशीम धाग्याला जगात सर्वाधिक मागणी आहे. या क्षेत्रात २८ हजार ५०० कोटीची निर्यात होत असून, कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. पारंपरिक पद्धतीने मटका व पायावर १४ दिवसात केवळ एक किलो रेशीम धागा तयार करता येत असल्यामुळे दैनंदिन मजुरीसुद्धा अत्यल्प मिळत होती. बुनियादी या नवीन मशीनमुळे आता दर दिवशी २०० ग्रॅमपेक्षा जास्त धागा तयार करणे सुलभ होत असल्यामुळे २५० रुपयापेक्षा जास्त मजुरी मिळणार आहे. केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या पुढाकाराने महिला विणकरांना हे यंत्र अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. देशात १० ठिकाणी एकाचवेळी बुनियाद रिलिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर वितरित करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे या प्रत्येक गावात विणकरांचे एक क्लस्टर तयार होणार आहे. टसर कोश अथवा रेशीम कोश विक्रीसाठी बाहेर न पाठवता त्यावर प्रक्रिया करून कोसा सिल्क साड्यांसह विविध उत्पादन घेण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. रेशीम व टसर उत्पादनाला विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगाराची विशेषत: महिलांसाठी प्रचंड क्षमता असलेल्या या उद्योगाला निश्चितच ‘अच्छे दिन’ येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा निर्माण होतील. (प्रतिनिधी)