शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा डिजिटल होणार

By admin | Updated: February 7, 2016 03:00 IST

माहिती तंत्रज्ञानामुळे राज्यासह देशाचा विकास प्रचंड वेगाने होत आहे. त्याअंतर्गत २ आॅक्टोबर २०१६ ला नागपूर जिल्हा संपूर्णरीत्या डिजिटल होणार आहे.

मुख्यमंत्री यांची ‘कॉम्प-एक्स’ला भेट : देशातील पहिला जिल्हा ठरणारनागपूर : माहिती तंत्रज्ञानामुळे राज्यासह देशाचा विकास प्रचंड वेगाने होत आहे. त्याअंतर्गत २ आॅक्टोबर २०१६ ला नागपूर जिल्हा संपूर्णरीत्या डिजिटल होणार आहे. तो देशातील पहिला जिल्हा ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कस्तुरचंद पार्कवर सुरू असलेल्या २४ व्या ‘कॉम्प-एक्स-२०१६’ प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली आणि प्रदर्शनाची पाहणी केली. या समारंभात ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी, एचपी एन्टरप्राईजेसचे विभागीय प्रमुख मोहित मंदोविया व एचपी इंकचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक भरत ढाका उपस्थित होते. सध्या आयटी क्षेत्रात संशोधनाची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(वा. प्र.)२५० सेवा आॅनलाईन होणारई-गव्हर्नन्सवर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले, २ आॅक्टोबरला २५० सेवा आॅनलाईन होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मेटमधील या सेवांचा फायदा मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव माहिती तंत्रज्ञानाने जोडले जाईल आणि त्याचा फायदा शेतकरी व उत्पादकांना होणार आहे. या सर्व सेवा सुरू करताना ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’ची निश्चितच मदत होणार आहे. सध्या डिजिटल फॉर्मेटमध्ये १५० आॅनलाईन सेवा आहेत. त्यावर आतापर्यंत जवळपास ८ हजार इलेक्ट्रॉनिक्स अर्ज आले आहेत. त्यात ९९ टक्के पारदर्शक सेवा दिल्या आहेत. हे सर्व आयटीमुळे शक्य झाले आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील १० स्मार्ट शहरांचा विकाससुद्धा आयटीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रदर्शन अखेरचे दोन दिवसपाच दिवसीय प्रदर्शन सोमवार, ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. हे प्रदर्शन १० डोममध्ये भरविण्यात आले आहे. त्यात २४ पॅव्हेलियन आणि ६५ स्टॉल आहेत.