शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! नागपूर जिल्ह्यात ५१,५५६ पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 22:24 IST

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात रिकव्हरी रेट ८०.८६ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान एक आनंदाची बातमीही आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे.आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३६२ व ग्रामीणमधील २४८ आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसात संसर्ग वाढल्याने रिकव्हरी रेट ४१ टक्केवर आली होती. परंतु सध्या संसर्ग वाढत असतानाही बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी नागपूर शहरातील ४२,२९८ आणि ग्रामीणमधील ९२५८ आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३,७५७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या २०४४ झाली आहे. १०,१५७ अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत. यात शहरातील ५५७० तर ग्रामीणमधील ४५८७ आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ५०८३ होम आयसोलेशनमध्ये आहेत.३१ जुलैपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३९२ झाली होती. तर १२६ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण ३४७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. अ‍ॅक्टीव्ह केसेस १७८९ होते. त्यामुळे जुलैच्या शेवटी रिकव्हरी रेट ६४.४८ इतके होते. तेच ऑगस्टच्या शेवटी नागपूर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९,५५५ झाली होती. तर १०४५ जणांचा मृत्यू झाला होता. ३१ ऑगस्टपर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले हाोते. अ‍ॅक्टीव्ह केसेस ९२६६ होते. अशा परिस्थितीत ऑगस्टच्या शेवटी रिकव्हरी रेट ६५.११ टक्केवर पोहोचला. परंतु सप्टेंबरमध्ये ज्या गतीने रुग्ण आढळून आले, त्याच गतीने बरे होण्याचे प्रमाणही वाढले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या