शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नागपुरात अफवा व दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 20:30 IST

शहरातील ५९ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून अफवा परविणाऱ्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ‘क्लिपिंग’ व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे५९ लोकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होतेसोशल मीडियावर व्हायरल झाली होती क्लिपसायबर सेल सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ५९ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून अफवा परविणाऱ्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ‘क्लिपिंग’ व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली. पोलीस सायबर सेलच्या मदतीने ही क्लिपिंग व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.मंगळवारी सोशल मीडियावर एक ‘क्लिपिंग’ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या क्लिपिंगमध्ये दोन व्यक्ती बोलत आहेत. एकजण दुसऱ्याला नागपुरात कोरोनाचे २०० पेक्षा अधिक प्रकरणे उघडकीस आल्याचे सांगत ५९ लोक पॉझिटिव्ह असल्याचे सांगत आहे. त्यांचे म्हणणे होते की, मेडिकलमधील एक डॉक्टर कोरोनामुळे व्हेंटिलेटरवर आहे. त्या डॉक्टरमध्ये सुरुवातीपासूनच कोरोनाचे लक्षण दिसून येत होते. मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेत टेस्ट केल्यानंतर त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आली होती. कोरोनाचे लक्षण जास्त वाढल्याने मुंबईच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले. यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. क्लिपिंगमधील व्यक्ती मुंबईत पाठवलेल्या नागपुरातील १८ डॉक्टरांपैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचेही सांगत आहे. चर्चेदरम्यान त्याने एका जणाचे नाव घेत त्याच्या हवाल्याने ही माहिती मिळाल्याचे सांगत आहे. या चर्चेदरम्यान तो असेही सांगत आहे की, स्वीडनमधील ६ डॉक्टरांची टीम नागपुरात येऊन २०० रुग्णांवर उपचार आणि मेडिकलच्या स्टाफला १२ दिवसांचे प्रशिक्षण देणार आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी ठेवलेला आहे. ही क्लिपिंग पाहता पाहता शहरातील बहुतांश सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल झाली. या क्लिपिंगने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. प्रशासनातर्फे ही क्लिपिंग खोटी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.या क्लिपिंगमुळे नागरिकांमध्ये दहशत व अफवा पसरविल्यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलीस कंट्रोल रूमचे निरीक्षक सोपान गोंद यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याआधारावर पोलिसांनी भादंवि कलम १८८, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक अधिनियम तथा महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदर पोलीस सायबर सेलच्या मदतीने क्लीपिंग बनवून ती व्हायरल करणाºयाचा शोध घेत आहे. पोलीस व प्रशासन कोरोनाशी लढण्यासाठी युद्धस्तरावर काम करीत आहे. अशा परिस्थितीत असामाजिक तत्त्व खोटी माहिती प्रसारित करून दहशत निर्माण करीत आहेत. आरोग्य विभागाने १४ मार्च रोजी कोरोनासंबंधात अधिसूचना जारी केली होती. याअंतर्गत कोरोनाशी संबंधित कुठलीही माहिती अथवा सूचनेची पुष्टी ही अगोदर प्रशासनाकडून करून घेणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या मंजुरीनंतरच याबाबतची माहिती किंवा सूचना प्रसारित व प्रकाशित करता येते. क्लीपिंग व्हायरल करणाºयाचा उद्देश हा दहशत पसरविणे हा होता.चार-पाच दिवस जुनी क्लीपिंगक्लीपिंगमधील चर्चेवरून ती चार ते पाच दिवस जुनी असल्याचा संशय आहे. त्यांच्या बोलण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या सीमा सील केल्याचे सांगितले आहे, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही क्लीप चार-पाच दिवस जुनी आहे. या क्लीपिंगमध्ये खोटी माहिती देणाºया व्यक्तीची नेते मंडळी व डॉक्टरांमध्ये उठबस असल्याचीही माहिती पुढे आली आहे.पोलीस कडक कारवाई करणारघरात बंदिस्त झालेल्या लोकांकडे टीव्ही व मोबाईलशिवाय दुसरे कुठलेही साधन नाही. लोक अनेक ग्रुपशी जुळलेले असतात. दिवसभर मोबाईल हातात असल्याने ‘कोरोना क्लीपिंग’ पाहता पाहता व्हायरल झाली. लोकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. जर कुणी अफवा पसरवत असल्याचे आढळून आले तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.शक्य ती कडक कारवाई व्हावीअफवा पसरवून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध शक्य ती कठोर कारवाई केली गेली पाहिजे. हा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. सध्या देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडत आहे. त्यात अडथळे निर्माण करणे खपवून घेतले जाऊ शकत नाही. यासंदर्भात कठोर शिक्षेचा कायदा लागू होणेही गरजेचे आहे.अ‍ॅड. नितीन तेलगोटे, जिल्हा सरकारी वकील.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPolice Stationपोलीस ठाणे