लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थितीत भाडेकरूंना घरभाडे देणे कठीण झाले आहे. अशा नागरिकांना भाड्यासाठी घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकणे योग्य नाही. अनेक भाडेकरू जीवनावश्यक सेवांशी निगडित आहेत. त्यांना घराबाहेर जावे लागत आहे. यामुळे घर रिकामे करण्यासाठी त्यांना सांगणे चुकीचे आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान खासगी वाहनांना बंदी आहे. परंतु वृत्तपत्र आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या वाहनांना सूट आहे. वृत्तपत्रांचे वितरण गावागावात होते. त्यासाठी वृत्तपत्रांच्या वाहनांवर कुठलीच बंदी नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.केबलच्या मासिक बिलात दिलासाजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केबल टीव्ही ऑपरेटर्सला लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना मासिक बिलाच्या वसुलीत दिलासा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर पडलेल्या परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
घर रिकामे करून घेण्यास मनाई : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 00:04 IST
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
घर रिकामे करून घेण्यास मनाई : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ठळक मुद्देभाडेकरूंना दिलासा