शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात केवळ मनपाच ‘प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:40 IST

नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे, लवकरत ही कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे सुधार प्रन्यासच्या सर्व जागा व ले-आऊट मनपाकडे हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे, लवकरत ही कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली होती. याची सुरुवात म्हणून काही ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरितही करण्यात आले. मात्र नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या खुल्या जागा आणि प्रोजेक्ट महापालिकेला देण्यास विरोध दर्शविण्यात आला. यावर तोडगा काढण्यासाठी नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. समितीच्या दोन बैठकीही झाल्या. मात्र यावर तोडगा निघाला नाही. नागपूर सुधार प्रन्यास विकास संस्था म्हणून काम करीत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यासाठी आता नागपूर सुधार प्रन्यासकडील सर्व ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर सुधार प्रन्यासकडील काही योजना एनएमआरडीएकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले सर्व विकसित आणि अविकसित ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. खुल्या जागेचा वादही निकाली निघाला आहे. या सर्व जागा महानगरपालिकेकडे वर्ग होणार आहे.एनएमआरडीएच्या पदभरतीसाठी हवी यूडीची मंजुरीमेट्रो रिजनमधील सर्व कार्यभार एनएमआरडीएकडे वर्ग करण्यात आले आहे. सुधार प्रन्यासच्या माध्यमातून होत असलेला ताजबाग आणि दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशनल सेंटरचे कामही एनएमआरडीएला वर्ग करण्यात आले आहे. एनएमआरडीएकरता ३५९ पदांची मान्यता देण्यात आली आहे. याच्या पद भरतीसाठी नगर विकास (यूडी) विभागाची मंजुरी बाकी आहे. ती मिळताच भरती करण्यात येणार आहे. सुधार प्रन्यासचा कार्यभार एनएमआरडीएकडे देण्यात आल्याने कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका