लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने आजवर मला भरपूर दिले. आता महापौरपदाची जबाबदारी सोपविली आहे. महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन शहराचा चौफेर विकास करण्याला गती देऊ , असा विश्वास भाजपचे महापौरपदाचे उमेदवार व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सत्तापक्षनेता कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्षनेता पदाचे उमेदवार संदीप जाधव उपस्थित होते.स्वच्छता सर्वेक्षण, अतिक्रमणाची समस्या, सिमेंट रस्त्यांची कामे, यासह शहरातील विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करू. आम्ही निरंतर काम करणारे कार्यकर्ते आहोत. सर्वांना विश्वासात घेऊ न महापालिकेचा कारभार करणार असल्याची ग्वाही जोशी यांनी दिली. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका विचारात घेऊ न आम्ही तयारीला लागलो आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.समारंभ नको ; थेट कामाला सुरुवातमहापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा,त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात. यालाच आमचे प्राधान्य राहील. समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी यंत्रणा सक्षम के ली जाईल. महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावले जातील. सर्व नगरसेवकांची कामे करू. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पदग्रहण समारंभावर अनाठायी खर्च न करता २२ नोव्हेंबरला महापौर, उपमहापौर व सत्तापक्षनेते थेट कामाला सुरुवात करतीत. पदाधिकाऱ्यांचे स्वागत समारंभ आयोजित करू नये, शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ आणू नये, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
सर्वांना सोबत घेऊन नागपूर शहराचा विकास : संदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:28 IST
महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन शहराचा चौफेर विकास करण्याला गती देऊ , असा विश्वास भाजपचे महापौरपदाचे उमेदवार व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
सर्वांना सोबत घेऊन नागपूर शहराचा विकास : संदीप जोशी
ठळक मुद्देस्वच्छता, सिमेंट रोड व अतिक्रमण समस्या सोडविण्यावर भर