सौसर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश महामार्ग सुरक्षित आणि सरळ बनविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नागपूर-छिंदवाड़ा मार्गाच्या नुतनीकरणासाठी केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ४१२.४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाच्या निविदाही काढल्या आहेत.
नागपूर ते छिंदवाडा प्रवासात नरसिंहपूरपर्यंतच्या मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. यामुळे या मार्गाचे नुतनीकरण करण्याची मागणी माजी राज्यमंत्री नाना मोहोड यांनी केली होती. या मार्गाला मंजुरी दिल्यानंतर गडकरी यांनी शुक्रवारी या कामाच्या निविदा काढल्या. या मार्गाच्या नुुतनीकरणामुळे छिंदवाडा ते नागपूर हे ७० किलोमीटरचे अंतर ५० मिनिटात कापणे शक्य होणार आहे. वाढते प्रदूषण आणि अपघातावरही यामुळे नियंत्रण मिळवता येईल. या सोबतच, छिंदवाडाची नागपूरसोबत कनेक्टिव्हिटी वाढल्याने आर्थिक विकासाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
...
मार्गाच्या विकासावरील खर्च
छिंदवाडा-अमरवाडा-नरसिंहपूर : ११३ कोटी रु.
छिंदवाडा-सावनेर व छिंदवाडा रिंग रोड :१३३.२२ कोटी रु.
छिंदवाडा-मुलताई आणि छिंदवाडा-सोनाखार ते सिवनी : १३६.८७ कोटी रु.
...