ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 - 60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी देशाची केंद्र भूमी - नितीन गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या कानाकोप-यातून आंबेडकरी अनुयायी नागपुरातील दीक्षाभूमीवर येतात. यामुळे ही भूमी देशाची केंद्र भूमी झाली आहे. केंद्रसरकार व राज्यसरकारच्या विशेष प्रयत्नामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. बुद्धीस्ट सर्किटसाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दीक्षाभूमीलगत असलेली कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी माङो प्रयत्न सुरू आहेत. दीक्षाभूमीवर येणा:या प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धांचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे न्यावे, त्यांना हीच खरी आदरांजली ठरले.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - राजकुमार बडोले
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, अशी ग्वाही देत, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी 199क्मध्ये घटनेत दुरुस्ती होऊनही राज्यात नवबौद्धांच्या हक्कांची अंमलबजावणी झाली नाही, अशी खंत व्यक्त केली. नवबौद्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंतप्रधानांसोबत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करेल. बाबासाहेबांच्या 50 स्थळांचा विकास करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.