शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या ट्रॉफीने दूर केली अंधत्वाची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 11:43 IST

अंधत्व असलेल्या व्यक्तीला समाजच काय तर वेळप्रसंगी कुटुंबाकडूनही हेळसांड सहन करावी लागते. मात्र नागपूरच्या आत्मदीपम संस्थेने अंधत्वामुळे जगणे हरविलेल्या मुलींना प्रेम आणि काहीही शक्य करण्याचा आत्मविश्वासही दिला.

ठळक मुद्देविदर्भाच्या अंध मुलींचा संघ उपविजेताआत्मदीपम सोसायटीने दिले बळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधत्व असलेल्या व्यक्तीला समाजच काय तर वेळप्रसंगी कुटुंबाकडूनही हेळसांड सहन करावी लागते. मात्र नागपूरच्या आत्मदीपम संस्थेने अंधत्वामुळे जगणे हरविलेल्या मुलींना प्रेम आणि काहीही शक्य करण्याचा आत्मविश्वासही दिला. या आत्मविश्वासाच्या बळावर या मुलींनी थेट क्रि केटच्या मैदानापर्यंत धडक देत मैदान मारले व उपविजेताची ट्रॉफीही पदरात पाडली. ही ट्रॉफी हातात घेतलेल्या या मुलींच्या चेहऱ्यावर विश्वासाचे तेज दिसून येत होते.क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लार्इंड महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने १७ व १८ फेब्रुवारी यादरम्यान अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये आत्मदीपम संस्थेच्या पुढाकाराने पहिल्यांदाच विदर्भाची टीम सहभागी झाली होती. विदर्भात अंध पुरुषांची क्रिकेट टीम आहे. परंतु अंधाच्या क्रि केट संघटनेने महिलांसाठी पुढाकार घेतल्याने एक दिशा मिळाली. आत्मदीपम संस्थेने विदर्भातील पहिली महिलांची टीम तयार झाली. धरमपेठ एज्युकेशन सोसायटी, पर्सिस्टंट फाऊंडेशन यांच्या मदतीने हा संघ उभा झाला. या मुलींना धरमपेठ सायन्स कॉलेजच्या मैदानावर अंध पुरुषांच्या विदर्भाच्या टीमचे कॅप्टन अतुल हारोडे व व्यवस्थापक गोकुळ पारधी यांनी महिनाभर प्रशिक्षण दिले.स्पर्धेमध्ये राज्यातील पाच टीम सहभागी झाल्या होत्या. विदर्भाचा पहिला सामना एनएससीबी मुंबईसोबत झाला. मुंबईने ८ षटकात ६४ धावा काढल्या. विदर्भाच्या संघाने ६.३ षटकात लक्ष्य पूर्ण केले. यामध्ये मॅन आॅफ दि मॅच ठरलेली आरती अतकरी हिने ४० धावा व कॅप्टन अंकिता शिंदे हिने नॉट आऊट राहून १३ धावा केल्या. नाशिक विरुद्ध दुसरा सामना बरोबरीत सुटला. मात्र रनरेटच्या आधारे विदर्भ संघ विजेता ठरला. पुण्याविरुद्ध अंतिम सामन्यात विदर्भाने ५४ धावांचे लक्ष्य दिले होते. पुण्याच्या संघाने ९ गडी राखून विदर्भाला पराभूत केले. विदर्भाची उपकॅप्टन आरती अतकरी मॅन आॅफ दि सिरिज ठरली.विदर्भाच्या संघात ५ संपूर्ण दृष्टिहीन (बी-१) व ज्यांना ३ मीटर व ६ मीटरपर्यंत दिसू शकते (बी-२, बी-३) अशा ९ मुली होत्या. यात बी-१ गटातील कॅप्टन अंकिता शिंदे, अंकिता बावने, शालू वाघाडे, वर्षा मेश्राम, पल्लवी धाबार्डे आणि बी-२, बी-३ गटात उपकॅप्टन आरती अतकरी, भारती मावस्कर, प्रांजली आंबेकर, करिश्मा रेहपाडे, शीतल खेकडे, पिंकी ठाकरे, निकिता कन्नाके, पूजा राऊत, प्राजक्ता उके यांचा समावेश होता.विजेत्या संघाचा धरमपेठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आत्मदीपक सोसायटीच्या अध्यक्ष जिज्ञासा चवलढाल, प्राचार्य अखिलेश पेशवे, धरमपेठ संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, रत्नाकर केकतपुरे, डॉ. राहुल कलोडे उपस्थित होते.

आम्ही सुरुवातीपासून चांगले खेळलो. संघाची फलंदाजी चांगली होती, परंतु शेवटच्या सामन्यात गोलंदाजी कमी पडल्याने आम्ही सामना हरलो. मात्र कमी सरावात उपविजेता पद पटकाविणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यावर्षीच्या चुकांवर मात करून पुढल्या वर्षी विजेता ठरू.- अंकिता शिंदे, कॅप्टनअंधांसाठी पॅरा स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटर सुरू करायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अंध मुलांसाठी सर्व खेळ एका मैदानावर खेळता येतील यासाठी आवश्यक ती व्यवस्था शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.- जिज्ञासा चवलढाल, अध्यक्ष आत्मदीपक संस्था

टॅग्स :Cricketक्रिकेट