शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात होणार आठ कोटींच्या न्युक्लिअर मेडिसीनची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 10:55 IST

एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना मिळणार लाभ

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. या विभागामुळे कर्करोगाचा निदानासोबतच एन्डोक्रिनोलॉजी, थायराईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरणार आहे. राज्यात शासकीय रुग्णालयामध्ये नागपूर मेडिकलमध्ये सुरू होणारा हा पहिला विभाग असणार आहे.कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावरील उपचाराचा यशाचा दर वाढतो. शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. परंतु शासकीय रुग्णालयात येणाºया कर्करोगाच्या रुग्णांना याचे निदान करण्यासाठी खासगीचा रस्ता धरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘न्युक्लिअर थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही उपचारपद्धती एक्स-रे व सीटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आहे. यात ‘गॅमा कॅमेरा’च्या माध्यमातून कर्करोग आहे किंवा नाही, कर्करोग झाला असल्यास देत असलेल्या उपचाराला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्या किती पेशी बाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण या ‘न्युक्लिअर मेडिसीन’मध्ये होते. एखाद्या अवयवाला बाधा झाली असेल त्याचा किती भाग निकामी झाला आहे किंवा चांगला आहे तसेच उपचारामुळे किती प्रमाणात सुधारणा होते आहे या सर्व बाबी या उपचारपद्धतीमधून सामोर येतात. असेच हृदयरोग, एन्डोक्रिनोलॉजी, थायरॉईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी संदर्भात आहे. या नव्या विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.

हृदयाच्या अचूक स्थितीचेही निदानहृदयविकाराच्या धक्क्यानंतर हृदयाच्या स्नायूंची स्थिती कशी आहे, किती स्नायू मृत झाले आहेत याचा अचूक अंदाज ‘न्युक्लिअर मेडिसीन’मधून मिळतो. स्नायू मृत झाले असतील तर ‘स्टेंट’चा काही उपयोग होत नाही. अशा वेळेस उपचारांची पुढील दिशा ठरवता येते.

शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार‘न्युक्लिअर मेडिसीन’ ही अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. या उपचारपद्धतीमुळे रुग्णांना फायदा तर होईलच, सोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार आहे. विशेषत: भविष्यात सुरू होणाºया कॅन्सर इन्स्टिट्यूला हा विभाग पूरक ठरेल.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय