शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अनधिकृत बाजारांमुळे नागपूरकर बेजार

By admin | Updated: October 26, 2014 00:13 IST

नागपूर शहराचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनधिकृत ले-आऊटच्या माध्यमातून शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शहराच्या विविध भागात

वाहतुकीला अडथळा : चारचाकी वाहतूक होते बंद नागपूर : नागपूर शहराचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनधिकृत ले-आऊटच्या माध्यमातून शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शहराच्या विविध भागात नवेनवे अनधिकृत आठवडी व दैनंदिन बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. शहरात अधिकृत १० आठवडी बाजार व ६ दैनिक बाजार आहेत. या व्यतिरिक्त अनधिकृतपणे २३ ठिकाणी आठवडी बाजार व २० ठिकाणी दैनिक बाजार भरतो. बाजार ही नागरिकांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होते. मात्र, रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. चारचाकी वाहतूक तर जवळपास बंद होते. बाजाराच्या मार्गाने दुपारनंतर स्टारबसच्या फेऱ्या बंद होतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. बाजार संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी सडका भाजीपाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पडून राहतो. मटन विक्रेते मांसाचे तुकडे उघड्यावर फेकून देतात. याची दुर्गंधी पसरते. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांची गर्दी जमते. जनावरांची झुंज होते. यामुळे अपघात होतात. सोयीसाठी भरविल्या जाणाऱ्या या बाजारांमुळे नागरिकांची गैरसोय होते. महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. नागरिकांची बाजाराची गरज व अनधिकृत बाजारांमुळे होणारी गैरसोय विचारात घेता महापालिकेने संबंधित रस्त्यांवरील अनधिकृत बाजार मैदानांमध्ये स्थानांतरित करण्याची गरज आहे. जयताळा बाजारमंगलमूर्ती चौक ते जयताळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगच्या जागेत दर रविवारी बाजार भरतो. यामुळे वाहतुकीला मोठी कोंडी होते. रस्त्यावरच दुकाने थाटली जातात. मटन मार्केटही येथेच बसते. सुर्वेनगर ते यशोदानगरकडे जाणारा रस्ता जाम होतो. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना गव्हर्नमेंट प्रेस कॉलनीला वळसा घालून जावे लागते. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचतो. अशातच बाजाराने घाण होते. बाजार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजीपाला, कचरा तेथे पडून राहतो. जनावरे ते खायला गर्दी करतात. या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. अनंतनगर बाजारअनंतनगर ते बोरगाव दिनशा फॅक्ट्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर रविवारी अवैध बाजार भरतो. यामुळे मानकापूर, पागलखाना चौक, पोलीस लाईनकडून बोरगाव, गोरेवाडा, बरडे ले-आऊट, महेशनगर कडे जाणारी जड वाहतूक बंद असते. दुपारनंतर येथे बाजार लागतो. त्यामुळे या मार्गाने स्टार बसच्या फेऱ्या बंद होतात. रविवारच्या खरेदीसाठी सदर, बर्डीला जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना एकतर गिट्टीखदान मार्गाने जावे लागते किंवा अनंतनगरपर्यंत पायी येऊन नंतर तेथून आॅटोने जावे लागते. पारडी बाजाराने घेतले अनेकांचे प्राण नागपूर - भंडारा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे. या महार्गावर पारडी जवळ दर रविवारी अवैध बाजार भरतो. एच.बी. टाऊन जुना पारडी नाका ते नागनदी पुलाच्या पलिकडेपर्यंत रस्त्यावरच हा बाजार भरतो. भाजी विक्रेते डांबरी रस्त्यावरच दुकाने थाटतात. यामुळे जड वाहने जाण्यासाठी अत्यंत कमी जागा शिल्लक असते. नागनदीच्या पुलाकडे मच्छीबाजार भरतो. येथेतर चारचाकी जायलाही जागा राहत नाही. महामार्ग असल्यामुळे जड वाहनांची वर्दळ जास्त असते. बाजारामुळे अडथळा निर्माण होऊन अपघात होतात. प्रत्येक बाजाराच्या दिवशी येथे हमखास अपघात होतो. अशा अपघातांमध्ये अनेकांनी प्राण गमावले आहेत. हा बाजार हटविण्यासाठी आंदोलने झाली. रस्ता रोको करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बाजार रस्त्यावरच भरणे सुरू आहे. शांतिनगर बाजार शांतिनगर येथे दर सोमवारी अवैध आठवडी बाजार भरतो. दहीबाजार पूल ते मेहंदीबाग कडे जाणाऱ्या रस्त्यावर या दिवशी विके्रेते दुकाने थाटतात. या मार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आधीच दोन्ही बाजूला नाममात्र रस्ता उरला आहे. असे असताना या उरलेल्या जागेवरही बाजार भरत असल्यामुळे साधा रिक्षा देखील या रस्त्याने जाऊ शकत नाही. मेहंदीबाग, मेकोसाबाग, जरिपटकाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होते. येथूनच इतवारी रेल्वे स्टेशनकडे रस्ता जातो. बाजाराच्या दिवशी या रस्त्यावर असलेल्या गर्दीमुळे अनेकांना रेल्वे स्टेशनपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा गाडी चुकते. उदयनगर रिंग रोडउदयनगर चौक ते नवनाथ शाळेपर्यंत दर शनिवारी अवैध बाजार भरतो. यामुळे जम्बुदीपनगर, एनआयटी गार्डन, नवीन सुभेदारकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर डिव्हायडरवर देखील दोन्ही बाजुंनी भाजीची दुकाने थाटली जातात. त्यामुळे वाहनचालकांची आणखी गैरसोय होते. सायंकाळी ग्राहकांची व वाहनांची एकच गर्दी होते. बऱ्याचदा वाहनचालकांचे विक्रेत्यांशी वादही होतात. ढगे बंगला हुडकेश्वर पोलीस स्टेशन ते ढगे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर मंगळवारी अवैध बाजार भरतो. ८० फुटाच्या या रस्त्यावर दुतर्फा भाजी विक्रेते बसतात. बाजारात नाश्ता विक्रीची चार मोठी दुकाने तंबू टाकून थाटली जातात. या दुकानांपुढे तर चारचाकी जाण्यापुरतीही जागा नसते. या बाजारामुळे संतोषीनगर, धनगवळीनगर, दुबे नगर, विठ्ठल लॉन परिसर, सावरबांधे ले-आऊट आदी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रात्री आपल्या वाहनाने घरी परतताना मोठी कसरत करावी लागते. बुधवारी बाजार चोहोबाजूंनी फुगला सोमवारी पेठमधील मैदानावर दैनंदिन बाजार भरण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. येथे दर बुधवारी आठवडी बाजारालाही परवानगी आहे. हा बाजार बुधवारी बाजार म्हणून ओळखला जातो. या बाजाराचा आकार दिवसेंदिवस फुगत चालला आहे. महापालिकेने बाजार भरण्यासाठी आखून दिलेल्या जागेबाहेर मुख्य रस्त्यांपर्यंत बाजार पसरला आहे. सक्करदरा चौक, लंगडा पुतळा, गजानन मंदिर रघुजीनगर, सोमवारी क्वॉर्टर समोरपर्यंत बुधवारी बाजाराचा पसारा वाढला आहे. या सर्व रस्त्यांवरही विक्रेते दुकान थाटतात. (प्रतिनिधी)