शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे एक कोटींचे कर्ज लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेतून एका व्यापाऱ्याने एक कोटी रुपयाचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, त्याने ...

ठळक मुद्देबँकेला ७२ लाखांचा गंडा : पाच वर्षांनंतर प्रकरण उजेडात : कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेतून एका व्यापाऱ्याने एक कोटी रुपयाचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, त्याने तब्बल चार वर्षे बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले. वर्षभरापूर्वीपासून त्याने कर्जाची रक्कम भरणे बंद केल्याने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. विजयकुमार जमुनादास धुंदानी (वय ५६) असे आरोपीचे नाव असून, बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.धुंदानी हा व्हीएमव्ही कॉलेजसमोर राहतो. त्याने २०१३ मध्ये कोतवालीतील स्टेट बँक शाखेत कर्ज प्रकरण सादर केले. बनावट कागदपत्रे जोडून आणि बँक अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने १६ आॅक्टोबर २०१३ रोजी बँकेतून १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. त्यानंतर बँकेने पाडून दिलेल्या कर्जाचे हप्तेही त्याने व्यवस्थित भरले. २९ सप्टेंबर २०१७ पासून मात्र त्याने कर्जाची थकीत रक्कम भरणे बंद केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क केला. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेच्यावतीने शेरिल सिसेल अ‍ॅन्थोनी (वय ३२) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणी विजयकुमार धुंदानी विरुद्ध शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी