शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तेजस्विनी महिला विशेष बसचा ९.६० कोटींचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 20:18 IST

महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अखर्चित आहे.

ठळक मुद्देमनपा परिवहन विभागाचे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून निधी अखर्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अखर्चित आहे.फेबु्रवारीचा दुसरा आठवडा संपायला आला तरी अद्याप तेजस्विनी बसच्या निविदा काढण्यात आलेल्या नाही. यामुळे अखर्चित निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाचा दर महिन्याचा तोटा आठ ते नऊ कोटी आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून उपलब्ध झालेला निधी खर्च होत नसल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत शहर बससेवा पर्यावरणपूरक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डिझेल बसेस कमी करण्याचा सल्ला दिला होता. याचा विचार करता शासनाकडून मिळालेल्या निधीतून तेजस्विनी बसेससाठी पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.गडकरी यांच्या बैठकीनंतर काही दिवसातच परिवहन समितीच्या बैठकीत पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु २० दिवसानंतरही परिवहन विभागाने बस खरेदीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. निर्धारित कालावधीत निविदा न काढल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.प्रस्तावाला समितीची मंजुरीशहर बससेवा पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी परिवहन समितीचे प्रयत्न आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनी बससाठी मिळालेल्या निधीतून पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येतील. महिलांसाठी त्यात बदल केला जाईल. समितीने याबाबतच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली. परिवहन विभागाकडे फाईल पाठविण्यात आली आहे. परिवहन व्यवस्थापकासोबत चर्चा करून बसेस खरेदी करण्याचे निर्देश दिले जातील. या प्रकल्पाकडे गडकरी यांचेही लक्ष आहे.बंटी कुकडे, परिवहन सभापती महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTravelप्रवास