लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या एका तरुण ऑटोचालकाने आर्थिक कोंडीला कंटाळून आत्महत्या केली. रिंकेश हेमराज महापूलकर ( वय २२) असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. तो एमआयडीसी हिंगणा मार्गावरील वानाडोंगरीत राहत होता. रिंकेश ऑटो चालवायचा. लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार बंद झाला होता. त्यामुळे त्याची तीव्र आर्थिक कोंडी झाली होती. त्याला कंटाळून रविवारी दुपारी २ च्या सुमारास रिंकेशने गळफास लावून आत्महत्या केली. रमेश महापूलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात ऑटोचालकाने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:01 IST