शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 10:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी ...

ठळक मुद्देचोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी १० हजारांवर अधिकारी, कर्मचारी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कळमना मार्केट, शासकीय समाजभवन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. विधानभवनापासून काही स्थळ लांब असल्याने ते वगळण्यात आल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय शासकीय वसतिगृहात करण्यात येत आहे. चोखामेळा वसतिगृहातील खोल्या पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहच खाली करण्यात सांगितले आहे. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याची माहिती आहे. चोखामेळा वसतिगृहात दीडशेवर मुलांच्या राहण्याची सोय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळा असल्याने स्थानिक प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना हलविण्यास त्यांची गैरसोय होईल, असे म्हणत समाजकल्याण विभागाने विरोध दर्शविला. ाात्र प्रशासनाने वसतिगृह देण्याचे आदेश काढल्याची माहिती आहे. विदर्भातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र हे अधिवेशनच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

चोखामेळा वसतिगृह पाडून त्या जागी नवीन वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. याचे कार्य महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहात यंदा नवीन विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सुरू आहे. यातच अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृह द्यावे, त्यानंतर इमारतीचे काम सुरू करावे, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली. अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आलेले नाही.- विजय वाकुळकर,समाजकल्याण अधिकारी

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८