शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून केला बसच्या तिकिटांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:28 IST

‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्दे‘आपली बस’चे चालक व वाहकांकडून मोबाईल जप्त : ग्रुपमध्ये अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली आहे.‘आपली बस’ने प्रवास करणाऱ्यांच्या तिकिटांचे पैसे स्वत:च्या खिशात टाकणारे बसचालक, वाहक आणि तपासनीकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मनपा परिवहन समिती करीत आहे. परिवहन समितीने नियुक्त केलेल्या तपासणी चमूने शहरातील वेगवेगळ्या मार्गावरील बसेसची तपासणी सुरू करून चालक व वाहकांचे १२ मोबाईल जप्त केले. मोबाईलमधून अनेक आश्चर्यजनक माहिती पुढे आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या लोकेशनची माहिती तिकिटांचे पैसे हडप करणाऱ्या टोळीला आहे. परिवहन समितीने संबंधित प्रकरणाची पोलिसाच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे. सोबतच दोषींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची तयारी सुरू आहे.प्रचंड तोट्यातील मनपा परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी प्रयत्नरत आहेत. बसमधील प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकिट न देण्याचे प्रकरण उजेडात आले आहेत. वाहकांना निलंबित केल्यानंतरही स्थिती सुधारली नाही. अशा स्थितीत परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी तिकिटांचा घोटाळा उजेडात आणण्यासाठी नवीन योजना तयार केली. त्याअंतर्गत आकस्मिक तपासणी करून चालक व वाहकांकडील मोबाईल जप्त करण्यास सुुरुवात केली. त्याची जबाबदारी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी तपासणी चमू तयार करून गेल्या दोन दिवसांत १२ मोबाईल जप्त केले. जप्त मोबाईलमध्ये जवळपास एक डझन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून रॅकेटवर नियंत्रण ठेवण्यात येत होते. शिवाय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती लाईव्ह मिळाल्यावर समिती सतर्क झाली आहे. तिकिटांचे पैसे हडप करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा फायदा घेतला आहे.पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद करणार : कुकडेपरिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले की, तिकिटांचे पैसे हडप करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. तपासनीस कारोकरला निलंबित केले आहे. या ग्रुपला भारतीय कामगार सेनेचे अंबादास शेंडे यांच्यातर्फे संचालित करण्यात येत आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे लोकेशनची लाईव्ह माहिती ग्रुपवर असणे गंभीर बाब आहे. या प्रकरणात टोळीचा पत्ता शोधण्यात येईल. सायबर सेलकडे तक्रार केली आहे. दोषींच्या विरोधात पोलिसांत प्रकरणांची नोंद करणार आहे.चालक, वाहकाला बसमध्ये मोबाईल नेण्यावर बंदीचालक आणि वाहकाला बसमध्ये मोबाईल नेण्यावर बंदी आहे. हा नियम १३ एप्रिल २०१८ पासून ‘आपली बस’मध्ये लागू आहे. त्यानंतरही मोबाईलचा उपयोग चालक व वाहक सर्रास करीत आहेत. दिवाळीनंतर बसमध्ये मोबाईलच्या उपयोगावर पूर्णत: बंदी असल्याचे समितीने सांगितले होते. यासंदर्भात १६ नोव्हेंबरला पत्र जारी केले होते. मोबाईल असल्यास वाहकाला तिकीट मशीन देण्यात येत नव्हती. त्यामुळे ते मोबाईल लपवून ठेवीत होते. मशीन मिळाल्यानंतर चालक व वाहक मोबाईलचा उपयोग करीत असल्याचे दिसून आले आहे.

 

टॅग्स :ticketतिकिटfraudधोकेबाजी