शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ४४ ‘डिग्री’तही ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:29 IST

उपराजधानीत पारा तापला असतानादेखील लोकसभा निवडणुकांच्या मतदानात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. ४३.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असतानादेखील जवळपास ६० टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत ३ टक्क्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे हे विशेष.

ठळक मुद्देपारा चढला अन् मतदानाचा टक्काहीसकाळ-सायंकाळी मतदारांचा उत्साहलोकशाहीच्या उत्सवासाठी ‘यंगिस्तान’चा लक्षणीय पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पारा तापला असतानादेखील लोकसभा निवडणुकांच्या मतदानात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. ४३.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असतानादेखील जवळपास ६० टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत ३ टक्क्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे हे विशेष. 

उपराजधानीच्या सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाऱ्याने मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. परंतु एकूणच २०१४ सालच्या तुलनेत सुमारे जवळपास तीन टक्के अधिक मतदान जास्त झाले.मागील लोकसभा निवडणुकांत नागपुरात जवळपास ५७ टक्के मतदान झाले होते. यंदादेखील अशाच प्रकारचे वातावरण राहते की काय अशी धास्ती होती. परंतु तरुण व नवमतदारांनी दाखविलेल्या विशेष उत्साहामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी होती. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५६ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत नागपुरात २७.४७ टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त जाणवत होती.सहाजिकच मतदान केंद्रांवरील वर्दळदेखील कमी होऊ लागली. निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या ‘बूथ’वरील कार्यकर्तेदेखील सावलीकडे सरकले. त्यानंतर दुपारच्या सुमारास ठराविक गतीने मतदान सुरू होते. दुपारी ४ नंतर मात्र परत एकदा मतदानाने वेग घेतला. उन्हाचा मारा कमी झाल्याने गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांची मतदार केंद्रांवर लक्षणीय उपस्थिती होती. सायंकाळी ५ वाजता मतदानाचा आकडा ५३ टक्क्यांवर पोहोचला. यानंतर मतदान केंद्रांवर परत गर्दी होऊ लागली अन् शेवटी मतदानाच्या टक्केवारीने ‘फर्स्टक्लास’ मारलाच.सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती.मतदानाच्या टक्केवारीचा पल्लासकाळी ११ वाजता १७.५६%दुपारी १ वाजता २७.४७दुपारी ३ वाजता ३८.३५ %सायंकाळी ५ वाजता ५३.१३ %सायंकाळी ६ वाजता अंदाजे ६० %

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019