शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर @ 43.6

By admin | Updated: April 4, 2016 05:36 IST

उष्णतेत बऱ्यापैकी वाढ झाली असून रविवारी नागपूरचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून हे सर्वाधिक

नागपूर : उष्णतेत बऱ्यापैकी वाढ झाली असून रविवारी नागपूरचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून हे सर्वाधिक तापमान ठरले. सामान्यापेक्षा ५ अंश सेल्सिअस अधिक तापमान असल्यामुळे उन्हाचे चटके जाणवले. मागील २४ तासात कमाल तापमान १.६ अंशाने वाढले. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ४३.८ अंश सेल्सियस तापमान असल्यामुळे अकोल्यातही उष्णतेचे चटके जाणवले.हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरणात आर्द्रता कमी झाल्यामुळे आणि आकाश स्वच्छ असल्यामुळे तापमानात अचानक वाढ होत आहे. परंतु पाकिस्तान आणि पश्चिम राजस्थान दरम्यान एका कमी दाबाचे क्षेत्र मागील काही दिवसांपासून तयार झाले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटक दरम्यान उच्च दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विदर्भाच्या काही भागात आगामी २४ तासात जोराच्या वादळासह पाऊस येऊ शकतो. परंतु त्यानंतर पुन्हा मध्य भारतात उष्णतेची लाट येणार आहे. सध्या संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विदर्भात अकोल्यानंतर नागपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्याच प्रमाणे वर्धा कमाल तापमान ४३.५, चंद्रपूर ४२.८, ब्रह्मपुरी ४२.८, यवतमाळ ४२, बुलडाणा ४०.६,गोंदिया ४०.२ आणि वाशिममध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.(प्रतिनिधी)हवामान खात्याचा अंदाज चुकलानागपुरात पहिल्यांदा ‘हीट अ‍ॅक्शन प्लॉन’वर काम होत आहे. नागपूर महानगरपालिकेला यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या आकड्यांच्या आधारे महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. परंतु हवामान खात्याकडून आगामी ५ दिवसात जे आकडे उपलब्ध करून देण्यात आले, त्यात तापमान ४३.६ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता नव्हती. हवामान खात्याच्या आकड्यांच्या आधारे महापालिकेला काम करावे लागणार आहे. परंतु हवामान खात्याने दिलेले आकडेच रविवारी चुकल्यामुळे रविवारी ‘प्लॉन’वर काम होऊ शकले नाही.पाणपोईचा शुभारंभ, जनजागरण सुरूमहापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी मान्य केले की, हवामान खात्याने उपलब्ध करून दिलेल्या आकड्यात तापमान ४३ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली नव्हती. परंतु तरीसुद्धा महापालिकेच्या झोन कार्यालयांतर्फे ठिकठिकाणी पाणपोई लावण्यात येत आहे. जनजागृतीसाठी बॅनर,पोस्टर लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन महापालिका आणि नासुप्रच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांची कामे निश्चित करण्यात आली आहेत.