शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नागपुरकर हायटेक मतदानाला मुकणार

By admin | Updated: January 30, 2017 22:24 IST

नेमक्या कोणत्या उमेदवाराला मत दिले हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणूकांत निवडक भागातील मतदारांना उपलब्ध करुन दिली होती

योगेश पांडेनागपूर : नेमक्या कोणत्या उमेदवाराला मत दिले हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणूकांत निवडक भागातील मतदारांना उपलब्ध करुन दिली होती.  व्हीव्हीपॅट मशीनचा (व्होटर व्हेरिफाएबल पेपर आॅडीट ट्रेल) मतदानादरम्यान वापर होणार नसल्याने मनपा निवडणूकांत मात्र मतदारांना हायटेक मतदानाची संधी मिळणार नाही. मतदानातील पारदर्शकता वाढविण्यासाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग व्हायला हवा, अशी मागणी होत आहे. साधारणत:इव्हीएम मशीनमधील संबंधित उमेदवाराचे बटन दाबले की मतदान होते. परंतु अनेकदा आपण बरोबर बटन तर दाबले की नाही असा मतदारांना संभ्रम होतो. अनेकदा इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन) संदर्भात आक्षेप उपस्थित करण्यात येतात व त्याच्या प्रणालीवर शंका घेण्यात येतात. अगदी नागपुरातदेखील ह्यइव्हीएमह्णसंदर्भात विविध सादरीकरणे झाली होती व शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. हीच बाब लक्षात घेता लोकसभा निवडणूकांत २० हजार केंद्रांवर व्हीव्हीपॅट लावण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणूकांदरम्यान नागपूर जिल्ह्यातील एका मतदानकेंद्रावर ही मशीन लागली होती. देशातील विविध ठिकाणच्या निवडणूकांत यांचा उपयोग झाला व याचे स्वागतदेखील झाले होते.यंदाच्या मनपा निवडणूकांसाठी उपराजधानी सज्ज होत आहे. या निवडणूकांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची झलक दिसेल अशी मतदारांना अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने मात्र ही मशीन येथे न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले. निवडणूकांतील पारदर्शकता वाढावी व आक्षेप घेण्यास कुणालाही जागा राहू नये यासाठी ह्यव्हीव्हीपॅटह्णचा उपयोग हवा, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे. त्यानुसारच ह्यव्हीव्हीपॅटह्ण मशीनचा उपयोग होणार नसल्याचे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे यांनी स्पष्ट केले.पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रयत्न हवेतनिवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता अपेक्षित आहे. पारदर्शकतेतूनच लोकशाही मजबूत होते. त्यामुळे जर ह्यव्हीव्हीपॅटह्ण मशीनचा पर्याय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगासाठी ते फारसे कठीण काम नाही. यामुळे मतदारांचा निवडणूक प्रणालीवरील विश्वास वाढीस लागेल, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.काय आहे व्हीव्हीपॅट?व्हीव्हीपॅट या मशीनच्या उपयोगाने मतदारांनी कोणत्या उमेदवाराला मत दिले याचे ह्यप्रिंटआऊटह्ण काढणे शक्य होणार आहे. प्रत्येक व्हीव्हीपॅटला सहजतेने इव्हीएमशी जोडता येते. ज्यावेळी मतदार ह्यइव्हीएमह्णवर बटन दाबतो, त्यावेळी लगेच या मशीनमधून ह्यप्रिंटआऊटह्ण निघते. यात कोणत्या उमेदवाराला मत दिले व त्याच्या पक्षाचे चिन्ह या २ गोष्टी असतात. मशीनवर बसविलेल्या काचेच्या पलीकडून ७ सेकंदासाठी मतदारांना हे दिसू शकते. त्यानंतर मशीनमधीलच एका मोठ्या ह्यबॉक्सह्णमध्ये या प्रिंटआऊट्सच्या स्लीप्सजमा होतात. विशेष म्हणजे मतदार या प्रिंटआऊटला हात लावू शकत नाही. या मशीनमधून निघणाऱ्या प्रिंटआऊट निवडणुकांनंतर दाखल होणाऱ्या न्यायालयीन खटल्यांदरम्यान कामात येऊ शकतात.