शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

एएफडीच्या सहकार्याने नागनदीचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:37 IST

नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्त : नागनदी प्रकल्पावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे वनामती येथे रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट, सिबीला जान्सिक , पी.के. दास असोसिएशनचे समर्थ दास, मिसाका हेत्तीयारच्ची, प्रियंका जैन, ब्लेंझ वारलेट, उपायुक्त राजेश मोहिते, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इस्राइल, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.एएफडी फ्रान्सने माझी मेट्रोच्या माध्यमातून नागपूरच्या विकासाला सहकार्य केले आहे. आता नागनदीच्या पुनरूज्जीवनासाठी पुढाकार घेतल्याने आपल्याला नव्या रूपात पाहता येणार आहे. आजच्या घडीला नागपूर शहर विकासाच्या बाबतीत जगातील पहिल्या २० शहरांमध्ये आहे. यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नागपूरकरांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे रवींद्र ठाकरे म्हणाले.अधिकाऱ्यांचा सहभागशहरातील विविध भागामधून वाहत जाणाऱ्या नागनदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात मत मांडण्यासाठी प्रत्यक्ष सहभागाद्वारे चर्चा करण्यात आली. कार्यशाळेमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन गटात विभागणी करण्यात आली. नागनदी वाहत असलेल्या सीताबर्डी, प्रजापती नगर व अंबाझरी परिसर हे तीन भाग तीन गटात विभाजित करण्यात आले. यावर नागनदीच्या पुनरुज्जीवनासाठी संकल्पना, सूचना मागविण्यात आल्या व त्यावर चर्चा करण्यात आली. नदी प्रदूषित होण्यामागील कारणे, त्यावरील उपाय, प्रदूषित करणारे घटक, त्यांचा मानवी जीवन व नदीवर पडणारा प्रभाव याबाबतही विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. सदर कार्यशाळा दोन दिवस चालणार असून विषयाशी संबंधित सादरीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीFranceफ्रान्स