शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

By admin | Updated: December 10, 2015 03:06 IST

मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे,

पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा : पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी खर्च अपेक्षितनागपूर : मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाणार आहे. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून १८ वर्षापर्यत ३१११.१८ रुपये एवढा खर्च करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन करतांना सांगितले.निवेदनामध्ये माहिती देतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले, माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एक मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थी मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये, मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षाकरिता १० हजार रुपये, मुलीच्या ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा दरम्यान पोषण आहार व इतर खचार्साठी ७ वर्षाकरिता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे. ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरिता २ हजार ५०० रुपये, दोन्ही मुली ५ वर्ष वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षासाठी १० हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ५ वर्षासाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ७ वर्षासाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपयाचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयाच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. योजनेची वैशिष्ट्ये अशी ४पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना ५ हजार रुपये पर्यंत सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येईल. ४ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला ५ लाखाचे पारितोषिक देण्यात येईल. ४मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार आहे. पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये विमाच्या लाभ मिळणार आहे.