शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी मेट्रो’ ने घेतला रस्त्याचा ताबा!

By admin | Updated: August 11, 2016 01:58 IST

गतीने काम सुरू असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोने जनसामान्यांपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत.

विना कामाने लावले बॅरिकेट : वाहतुकीचा खोळंबा नागपूर : गतीने काम सुरू असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोने जनसामान्यांपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या रस्त्यावर कामही करण्यात येणार नाही, अशा रस्त्यावरही बॅरिकेट लावून रस्ते अडवून धरले आहे. बॅरिकेट लावल्याने अरुंद झालेल्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघाताची शक्यता बळावली आहे. अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावर हे दृश्य बघायला मिळते. ‘वर्क इन प्रोग्रेस’ चे बोर्ड लावून वेगाने काम सुरू असल्याचे भासविणाऱ्या ‘माझी मेट्रो’च्या कामाची स्थिती जाणुन घेण्यासाठी बुधवारी दुपारी लोकमतची टीम अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्याच्या रोडवर पोहचली. हातात हिरवी झेंडी घेऊन एक कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वाहतुक खोळंबल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता. लोकमतच्या टीमने या कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, त्याने सांगितले की, गेल्या ३-४ दिवसापासून बॅरिकेट लावण्यात आले आहे. परंतु काम सुरू नसतानाही बॅरिकेट का लावण्यात आले असे विचारल्यावर तो म्हणाला की, २-३ दिवसात मोठी मशीन येणार आहे. त्यानंतर काम सुरू होणार आहे. त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात एसटी बसेसची वाहतूक असते. वर्धा, चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसेस रहाटे कॉलनी मार्गे याच रस्त्याने जातात. वाहतुकीच्या कोंडीमुळे अ‍ॅम्ब्युलन्स फसली बॅरिकेटचा सर्वाधिक त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे. धंतोलीत मोठ्या संख्येने रुग्णालय आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अ‍ॅम्ब्युलन्सची वाहतूक होते. बुधवारी दुपारी लोकमतच्या टीमपुढेच अरुंद रस्त्यामुळे एसटी बसला मार्ग काढताना अडचण येत होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अशातच एक अ‍ॅम्ब्युलन्स याच रस्त्यावरून आली आणि वाहतुकीच्या कोंडीत फसली. त्यामुळे काही वाहनचालकांनी स्वत: पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करून अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग करून दिला.