शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

माझी मेट्रोच्या प्रवाशांमध्ये होतेय वाढ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

नागपूर : माझी मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या मेट्रो रेल्वे सेवेंतर्गत रविवारी २० डिसेंबरला सर्वाधिक ...

नागपूर : माझी मेट्रोचे प्रवासी वाढत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झालेल्या मेट्रो रेल्वे सेवेंतर्गत रविवारी २० डिसेंबरला सर्वाधिक १७ हजार ५६२ प्रवाशांनी माझी मेट्रोने प्रवास केला. प्रत्येक रविवारी प्रवाशांची संख्या वाढत आहे. शनिवारी आणि रविवार सोडून इतर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सरासरी १० हजार पेक्षा अधिक आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रवाशांची होत असलेली वाढ ही जयपूर, नोएडा आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने मेट्रो रेल्वे सेवा ठप्प होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच मेट्रो रेल्वेस्थानकांच्या कामाने गती घेतली. विविध मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी अनलॉक होऊन आता प्रवाशांना देवा देत आहेत. याचा लाभ नागपूरकरांना होत आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेगाड्यात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २० डिसेंबरला ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईनवर धावलेल्या माझी मेट्रोतून १७ हजार ५६२ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांना आपली किंवा महामेट्रोच्या फिडर सर्व्हिस अंतर्गत उपलब्ध सायकल मेट्रोने नेण्याची सुविधा पसंत येत आहे. तर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी, समाजसेवक नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी मेट्रोने शहरातील आणि स्टेशन परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांना मेट्रो स्टेशन अ‍ॅम्बेसिडर म्हणून जोडले आहे.

............

कोरोनापुर्वी रविवारी प्रवासी संख्या

तारीख प्रवासी

२६ जानेवारी २०२० २१२५८

२ फेब्रुवारी २०२० १७७४९

९ फेब्रुवारी २०२० १७९६८

१६ फेब्रुवारी २०२० १६५७९

२३ फेब्रुवारी २०२० १३७२६

कोरोनानंतर रविवारी प्रवासी संख्या

तारीख प्रवासी

२० डिसेंबर २०२० १७५६२

१३ डिसेंबर २०२० १५४०४

६ डिसेंबर २०२० १३१८७

२९ नोव्हेंबर २०२० ११४८८

..........