शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वेकाेलिच्या काेळशाची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेकाेलिच्या खाणीतील काेळसा काेल वाॅशरीजमध्ये नेण्यासाठी त्याची ट्रकने वाहतूक केली जाते. मात्र, एका ट्रकमधील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : वेकाेलिच्या खाणीतील काेळसा काेल वाॅशरीजमध्ये नेण्यासाठी त्याची ट्रकने वाहतूक केली जाते. मात्र, एका ट्रकमधील काेळसा मध्येच खाली करण्यात आला, अशी तक्रार काेळसा वाहतूक व्यावसायिकाने कन्हान पाेलीस ठाण्यात केली आहे. त्याअनुषंगाने पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, या प्रकरणाची चाैकशी सुरू असल्याचे सांगितले.

वेकाेलिच्या इंदर ओसीएम खाणीतील काेळसा ट्रकद्वारे गोंडेगाव कोल वाॅशरीज व साइडिंगमध्ये नेला जाताे. या कामाचे कंत्राट लोढा इंटरप्राइजेस नामक कंपनीला दिले आहे. या कंपनीने काेळशाच्या वाहतुकीसाठी काही ट्रक किरायाने घेतले आहेत. एमएच-४०/बीएल-३४१९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गुरुवारी (दि. १७) काेळसा भरला आणि हा ट्रक काेल वाॅशरीजच्या दिशेने निघाला. हा ट्रक सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कन्हान टाेल नाका मार्गे पारडी (नागपूर)ला गेला. तिथे ट्रकमधील काही काेळसा काढून ताेच ट्रक पुन्हा कामठी फाेर लेन परिसरात आला. हा ट्रक कन्हान टोल मार्गे डुमरी अण्णामाेडजवळ येताच ताब्यात घेण्यात आला. त्यावेळी ट्रकचालक व मालकाने ट्रक साेडून पळ काढला. विशेष म्हणजे, या ट्रकचा इंदर ओसीएम खाणीपासून पाठलाग करण्यात आला हाेता. या प्रकाराची माहिती पाेलिसांनाही देण्यात आली हाेती.

वेकोलिचे सहायक व्यवस्थापक अभसिंग, कामठी उपप्रादेशिक व्यवस्थापक विनयकुमार सिंग, कोल वॉशरीजचे व्यवस्थापक देशमुख व इन्चार्ज झुबैर शेख यांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने इंटकचे नरेश बर्वे यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांची भेट घेऊन तक्रार केली. वेकोलीच्या नागपूर भागातील इंदर ओसीएम, गोंडगाव ओसीएम, कामठी ओसीएम, भानेगाव ओसीएम व सिंगोरी ओसीएम फ्रेश व स्टीम कोल ट्रान्सपोर्टरला नियमांनुसार निविदेतील अटीनुसार जवळच्या गोंडेगाव कोळशाचे वाॅशरी किंवा डुमरी कोळसा साइडिंगवर नेले जावे. परंतु, कोळसा घेऊन जाणारे ट्रक मध्येच नागपूर किंवा इतर ठिकाणी जातात व ते खाली करून परत येतात. नियमांनुसार कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये ‘जीपीआरएस सिस्टीम लावावी, अशी मागणीही नरेश बर्वे यांनी केली.

...

काेळसा वाहतुकीदरम्यान चाेरी

खाणीत व काेल वाॅशरीज या दाेन्ही ठिकाणी काेळशाचे वजन केले जाते. काही ट्रकचालक व मालक मध्येच ट्रकमधील काेळसा काढतात आणि वजनात तफावत येऊ नये म्हणून त्यात दगड व खराब काेळसा टाकतात. ट्रकमधून मध्ये काढण्यात आलेल्या काेळशाची परस्पर विक्री करून पैसा कमावला जाताे. ही एक प्रकारे काेळशाची चाेरीच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

...

लोढा इंटरप्राइजेसच्या सुपरवायझरच्या तक्रारीवरून काेळसा वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकचालकाचा शाेध घेणे सुरू आहे. या प्रकरणात वेकाेलिकडून अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही.

- अरुण त्रिपाठी, ठाणेदार,

पाेलीस ठाणे, कन्हान.