शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम महिलांनी संघ पदाधिकाºयांना बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:57 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्य करणाºया मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला.

ठळक मुद्देमुस्लीम राष्ट्रीय मंचचे आयोजन : हिंदू-मुस्लीम बंधुभाव वाढविणारे रक्षासूत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्य करणाºया मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. हिंदू-मुस्लीम बंधुभाव वाढीस लागावा यासाठी मंचातर्फे शनिवारी अनोख्या पद्धतीने ‘रक्षाबंधन’ साजरे करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाºयांना मुस्लीम महिलांनी राखी बांधली.हंसापुरी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार, महानगर संघचालक राजेश लोया, सहकार्यवाह रवींद्र बोकारे, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, महाराष्ट्र संयोजक मोहम्मद फारुक, डॉ.संजय बालपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर मुस्लीम नागरिकांची उपस्थित होती. यावेळी इंद्रेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या देशातील सणांच्या माध्यमातून सामाजिक संदेश गेला पाहिजे.रक्षाबंधनाला देश, पंथ, धर्माचे बंधन नाही. लोकांना एकत्र आणणारा व जिव्हाळ्याच्या सूत्रात बांधणारा तसेच विषमता नष्ट करणारा हा सण आहे. विशेष म्हणजे महिलांचा सन्मान करणारा हा सण आहे. प्राचीन परंपरा असलेले हे रक्षाबंधन धर्माच्या चौकटीत ठेवणे योग्य नाही. अशा प्रकारच्या आयोजनांमुळे समाजात एकता वाढीस लागेल, असे मत यावेळी इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. यावेळी मुस्लीम महिलांनी इंद्रेशकुमार तसेच इतर उपस्थितांना राखी बांधली. नागपुरात अशा प्रकारच्या आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.