शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या प्रवाशांना संगीतमय मेजवानी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST

रविवारचा आनंद द्विगुणित : मेट्रो स्थानकावर शॉपिंगची सुविधा नागपूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे असंख्य नागपूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मेट्रोने ...

रविवारचा आनंद द्विगुणित : मेट्रो स्थानकावर शॉपिंगची सुविधा

नागपूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे असंख्य नागपूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मेट्रोने प्रवास करण्याचा बेत आखला. प्रवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी महा मेट्रोनेही प्रवाशांना संगीतमय मेजवानी दिली. सीताबर्डी येथील इंटरचेंज स्थानकावर प्रवाशांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.

महामेट्रोच्यावतीने सीताबर्डी येथील इंटरचेंज स्थानकावर गाण्याची, शॉपिंगची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था केली होती. दुपारी १२ ते ३ दरम्यान केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या (सीआरपीएफ) वतीने बँड वादन करण्यात आले. यात सीआरपीएफचे उपनिरीक्षक अनिल जी, विल्सन टी. जे, एम. एस. काटेवार, दिनेश कुमार, एच. के. दुबे, ए. एम. शेख, नितीन घंघाव, अश्विन कांबळे, महान जायभोले, पी. एन. सांडेकर, अतुल तबाली, नीलेश काकडे, सुनील मंजाळ, ललिंदर कुमार यांनी बँड वादन केले. दुपारी ४ ते सायंकाळी ६ दरम्यान गायक सचिन आणि सुरभी ढोमणे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रवाशांना भुरळ घातली. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांना प्रवाशांनी दाद दिली. सीताबर्डी इंटरजेंच स्थानकावर शॉपिंगसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. यात आयुर्वेदिक तसेच पर्यावरणपूरक वस्तु विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रवाशांना विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. बहुतांश प्रवाशांनी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गावर प्रवास करून आपले अनुभव कथन केले. नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या १५० सदस्यांनीही मेट्रोने प्रवास केला. महामेट्रोत सायकलसह प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील्स, फिडर सर्व्हिस सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे प्रवाशांचा मेट्रोला प्रतिसाद वाढत आहे.

..............