शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

खुनी हल्ला, वकिलाचा आत्मघात अन् ‘ती ’ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:05 IST

आपल्या सिनियरवर खुनी हल्ला चढवून स्वत: आत्महत्या करणाऱ्या वकिलाने मृत्युपूर्वी येथील एका ज्येष्ठ विधिज्ञाकडे आपली कैफियत मांडली. या थरारकांडाचे कारण सांगतानाच त्याने त्याची कथित पत्नी आणि सिनियरदरम्यान नाजूक संबंध असल्याचाही आरोप केला. नाव न छापण्याच्या अटीवर संबंधित ज्येष्ठ विधिज्ञांनी लोकमतला ही खळबळजनक माहिती दिली. दरम्यान, जिच्यामुळे संशय निर्माण झाला, जिच्यामुळे एका वकिलाने दुसºया वकिलावर खुनी हल्ला केला ती महिला अचानक बेपत्ता झाल्याने हे प्रकरण जास्तच रहस्यमय बनले आहे. या प्रकरणात वाढलेला गुंता ‘ती महिलाच सोडवू शकते’, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी तिला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहेत.

ठळक मुद्देमृत्युपूर्वी आरोपीने ज्येष्ठ विधिज्ञांकडे मांडली होती कैफियतनाजूक आरोप, आर्थिक व्यवहाराचाही पैलू

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सिनियरवर खुनी हल्ला चढवून स्वत: आत्महत्या करणाऱ्या वकिलाने मृत्युपूर्वी येथील एका ज्येष्ठ विधिज्ञाकडे आपली कैफियत मांडली. या थरारकांडाचे कारण सांगतानाच त्याने त्याची कथित पत्नी आणि सिनियरदरम्यान नाजूक संबंध असल्याचाही आरोप केला. नाव न छापण्याच्या अटीवर संबंधित ज्येष्ठ विधिज्ञांनी लोकमतला ही खळबळजनक माहिती दिली. दरम्यान, जिच्यामुळे संशय निर्माण झाला, जिच्यामुळे एका वकिलाने दुसऱ्या वकिलावर खुनी हल्ला केला ती महिला अचानक बेपत्ता झाल्याने हे प्रकरण जास्तच रहस्यमय बनले आहे. या प्रकरणात वाढलेला गुंता ‘ती महिलाच सोडवू शकते’, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी तिला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहेत.जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या समोर शुक्रवारी सायंकाळी नोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) या वकिलाने अ‍ॅड. सदानंद नारनवरे यांच्यावर कुऱ्हाडीचे अनेक घाव घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वीच नोकेशने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. अ‍ॅड. नारनवरे यांच्याकडे नोकेश ज्युनियर म्हणून काम करायचा. या घटनेने राज्यातील विधी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमागचे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस, पत्रकार, वकील आणि सर्वसामान्य नागरिकही उत्सुक आहेत.लोकमतने या संबंधाने संबंधित वर्तुळाचा कानोसा घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानुसार, नोकेशने अ‍ॅड. नारनवरे यांच्यावर खुनी हल्ला चढवल्यानंतर काही वकिलांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस चौकी आहे. वकिलांचा रोष बघता पोलिसांनी त्याला या चौकीत नेले. तेथे एका नामवंत विधिज्ञांनी नोकेशला या थरारक घटनेमागचे कारण विचारले. यावेळी नोकेशने जे काही सांगितले ते या थरारकांडाला आणखी गडद करणारे ठरले. त्यांच्या माहितीनुसार, नोकेश गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्याच्यापेक्षा १० ते १२ वर्षे वयाने मोठी असलेल्या एका महिलेसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रारंभी ते दोघे मनीषनगरात राहायचे. अलीकडे त्याने इंदोऱ्यातील महेशनगरात रूम केली होती. नोकेशच्या कथनानुसार, ही महिला काही दिवसांपासून नारनवरेच्या संपर्कात आली होती.ती त्यांच्यासोबत भेटीगाठी आणि फोनवरून सलग संपर्कात राहायची. नोकेशने तिला हटकताच ती त्याच्यापासून दुरावली होती. त्यामुळे नोकेश वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या मागावर राहायचा. ‘सिनियर’ने तिला साडेचार लाख रुपये दिल्याचे त्याला कळले. तेव्हापासून त्याचा संशय अधिक घट्ट झाला.१५ हजारांसाठी त्रास देणारे सिनियर आपल्या पार्टनरला साडेचार लाख रुपये देतात, ती त्याच्याशी लाडीगोडीने वागते आणि आपल्याशी हेकडपणे वागते, हा प्रकारच आपल्या डोक्यातील संशय घट्ट करणारा ठरला. त्यामुळेच आपण हे थरारकांड घडविल्याचे आणि स्वत:ही आत्मघात केल्याचे त्याने ज्येष्ठ विधिज्ञांना सांगितले. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेतील अ‍ॅड. नारनवरे यांना तसेच आरोपी नोकेशला पोलिसांनी मेयोत दाखल केले. तेथे आरोपी नोकेशला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने पोलिसांची धावपळ जास्तच वाढली. या घटनेमागचे खरे कारण आरोपी किंवा नारनवरेच सांगू शकतात. मात्र, पोलिसांना बयान देण्यापूर्वीच आरोपी मृत झाला, तर नारनवरेंची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या घटनेमागची पार्श्वभूमी आता ‘ती’ महिलाच सांगू शकते, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी तिची शोधाशोध सुरू केली. मात्र, घटना घडल्यापासून ती महिला बेपत्ता झाल्याने प्रकरण रहस्यमय बनले आहे. तिला शोधून काढण्यासाठी सीताबर्डी पोलिसांनी मनीषनगर, इंदोरा, जरीपटका आदी भागात शोधाशोध चालविली आहे.वास्तव तूर्त अंधारात!नोकेशने ज्येष्ठ विधिज्ञाकडे सांगितलेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेने खरेच सिनियरकडून साडेचार लाख रुपये घेतले होते का, असा प्रश्न आहे. घेतले असेल तर ते कशासाठी घेतले होते आणि सिनियरने ते कशासाठी दिले होते, असेही प्रश्न आहेत.बुद्धिकौशल्याच्या बळावर वकील मंडळी वंचित आणि पीडितांना न्याय मिळवून देतात. अनेकदा दूध का दूध आणि पानी का पानी करतात. काही वेळा खोट्याचे खरे अन् खºयाचे खोटेही होते. या प्रकरणातील वास्तव तूर्त अंधारात आहे. ‘ती’ महिला पुढे आल्यानंतरच खऱ्याचे खरे अन् खोट्याचे खोटे उजेडात येऊ शकते.

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याadvocateवकिल