शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:22 IST

प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठी व पेचकसने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देकाठी व पेचकसने केले डोक्यावर वार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (गुमथळा) : प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठी व पेचकसने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील सावळी (ता. कामठी) येथे घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.आकाश ऊर्फ गोलू श्रावण सोनटक्के (२३, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव असून, गजानन चरणदास शेंडे, पंकज शेंडे व दिनेश महतो (मूळचा बिहार येथील रहिवासी), तिघेही रा. सावळी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोलू वडोदा (ता. कामठी) येथील वंजारी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्कूलबसवर कंडक्टर म्हणून नोकरी करायचा. त्याची सावळी येथील इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनीशी मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.ही बाब दिनेशला माहीत असल्याने त्याने ती विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना सांगितली. शिवाय, त्यांना गोलूच्या विरोधात भडकवून दिले. दरम्यान, गोलू व त्याचा मित्र पीयूष नंदकिशोर चरडे (२१, रा. भूगाव) रविवारी (दि. ६) दुपारी सावळी येथे तिला भेटायला आले होते. पीयूषने गोलूला तिच्या घरी सोडले आणि मोटरसायकल घेऊन बाजूला उभा राहिला. गोलूने तिच्या घरात प्रवेश करताच तिच्या कुटुंबीयांनी दोघांनाही घेरले. मात्र, पीयूषने स्वत:ची सुटका करवून घेत पळ काढला.घराचे दार आतून बंद करून गजानन, पंकज व दिनेशने गोलूला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी गोलूच्या डोक्यावर काठी व पेचकसने जबर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्यातच शेतातील उसात लपून बसलेल्या पीयूषने पोलिसांना तसेच भूगाव येथील त्याच्या मित्रांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, त्यांना गोलू अंगणात जखमी अवस्थेत पडला असल्याचे दिसले. त्यांनी त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (दि. ११) सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी सुरुवातीला भादंवि ३०७ आणि नंतर ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार मधुकर गीते करीत आहेत.आरोपींची पोलीस कोठडीगोलू सुरुवातीपासूनच बेशद्धावस्थेत होता. या प्रकरणात पोलिसांनी घटनेच्या दिवशी तिघांना अटक केली होती. त्यांना पोलिसांनी मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या काळात त्यांच्याकडून त्यांनी मारहाणीसाठी वापरलेली काठी व पेचकस जप्त करण्यात आले. पे्रयसीचे कुटुंबीय गरीब असून, त्यांची गोलूला जीवे मारण्याची मुळीच इच्छा नव्हती. मात्र, दिनेश महतोच्या चिथावणीमुळे हा प्रकार घडल्याची तसेच ही घटना पीयूष चरडेमुळे उघड झाल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

टॅग्स :MurderखूनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट