शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

पत्नीची गळा दाबून हत्या, आरोपीची जन्मठेप कायम

By admin | Updated: July 7, 2014 00:57 IST

दुसऱ्या पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

हायकोर्ट : यवतमाळ जिल्ह्यातील घटनानागपूर : दुसऱ्या पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.शंकर भुराजी पांडे (५७) असे आरोपीचे नाव असून तो होरकाड, ता. पुसद येथील रहिवासी आहे. पुसद सत्र न्यायालयाने २९ मार्च २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड, तर कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.मृताचे नाव रेखा आहे. पतीसोबत वाद झाल्यामुळे ती शिवनी येथे माहेरी आली होती. आरोपीची पहिली पत्नी पंचफुला ढाकरे असून तिच्यापासून २ मुले व २ मुली आहेत. आरोपीसोबत भांडण झाल्यामुळे पंचफुला मुलांना घेऊन मुंगशी येथे माहेरी राहायला गेली होती. आरोपी नेहमीच शिवनीत जात होता. यामुळे त्याचे रेखासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.रेखा होरकाड येथे आरोपीसोबत राहायला लागली. घटनेच्या १२ ते १५ वर्षांपासून ते सोबत राहात होते. दरम्यान, आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी लग्नाची झाली. आरोपीने मुलीच्या लग्नासाठी रेखाला पैसे मागितले. रेखाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. आरोपी रेखाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. यातून रेखाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.२४ डिसेंबर २००७ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपीने रेखाची गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह पोत्यात भरून पैनगंगा नदीत फेकून दिला. आरोपीने २९ डिसेंबर रोजी रेखा दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून निघून गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याने रेखाच्या माहेरीही अशीच माहिती दिली. २ जानेवारी २००८ रोजी रेखाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तिच्या गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला होता. हा मफलर आरोपी वापरत होता. रेखाच्या काकाने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सत्र न्यायालयात १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. शासनातर्फे एपीपी संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)