शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

संपत्तीच्या वादातून काकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

नागपूर : संपत्तीच्या वादातून पाच वर्षाच्या मुलाचा गळा आवळून हत्या करण्याची धमकी देणाऱ्या दारूड्या काकाची एका युवकाने पत्नीच्या मदतीने ...

नागपूर : संपत्तीच्या वादातून पाच वर्षाच्या मुलाचा गळा आवळून हत्या करण्याची धमकी देणाऱ्या दारूड्या काकाची एका युवकाने पत्नीच्या मदतीने हत्या केली. ही घटना रविवारी रात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगर येथे घडली. मृताचे नाव नामदेव लक्ष्मण निनावे (५५) आहे, तर आरोपी नितीन निनावे त्याची पत्नी माधुरी आहे.

नितीन चिकन सेंटरमध्ये काम करतो. मृत नामदेव त्याचा काका आहे. नामदेव दारूड्या आहे. तो अविवाहित असून फुगे विकत होता. नामदेव ज्या घरी राहत होता, तिथे नितीन, त्याची पत्नी, पाच वर्षाचा मुलगा व त्याची आईसुद्धा राहते. नामदेव नेहमीच नितीन व त्याच्या कुटुंबीयाला शिविगाळ करीत असे. तो घर सोडून जाण्यास धमकावीत असे. नितीनने घरात वडिलांचासुद्धा हिस्सा असल्याचे सांगून बाहेर पडण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद नेहमीच होत होता. डिसेंबर २०२० ला नामदेवने नितीनच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. पाचपावली पोलिसांनी नामदेवच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, तरीही नामदेवचा स्वभाव बदलला नाही. रविवारी रात्री ९ वाजता नामदेवने पुन्हा नितीनसोबत वाद घातला. नितीनच्या पाच वर्षाच्या मुलाचा गळा कापण्याची धमकी त्याने दिली. नामदेवने यापूर्वी त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला होता. आता मुलाच्या हत्येची धमकी दिल्यामुळे दोघेही नवरा-बायको संतापले. नितीनने पत्नीच्या मदतीने हातोड्याने वार करून नामदेवला गंभीर जखमी करून फरार झाला. नामदेवला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पाचपावली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला अटक केली.