शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी महिलेसह दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

शहरात प्रचंड खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत आज एकाच दिवशी हत्येच्या दोन थरारक घटना घडल्या. सकाळी १०.१५ ...

शहरात प्रचंड खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत आज एकाच दिवशी हत्येच्या दोन थरारक घटना घडल्या. सकाळी १०.१५ च्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाची त्याच्या प्रतिस्पर्धी गुंडांनी हत्या केली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच एमआयडीसीत एसआरपीएफच्या एका निवृत्त कर्मचारी महिलेचीही हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली होती.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पच्या मागे सप्तकनगर आहे. येथे विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) राहत होत्या. विजयाबाई एसआरपीएफच्या मेसमध्ये कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्या स्वतःच्या घरात सप्तकनगरात राहायला गेल्या. त्यांचा मुलगा अमोल एसआरपीएफमध्ये सेवारत असून तो वेगळा राहतो. त्यांना दोन विवाहित मुलीसुद्धा आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२.३० ते १च्या सुमारास मोलकरीण त्यांच्याकडे कामाला गेली असता विजयाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती कळताच ठाणेदार युवराज हांडे तसेच एमआयडीसी पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी पोहोचले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध विजयाबाई यांची हत्या कोणी आणि का केली असावी, ते वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. मात्र, लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवित आहेत. आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक बोलवून घेतले. श्वान आजूबाजूच्या भागात घुटमळले. त्यातून पोलिसांच्या हाती ठोस असे काही मिळाले नाही.

महालात गुंडाची हत्या

ही घटना उघड होण्यापूर्वी जुन्या वैमनस्यातून गुंडाच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानू ऊर्फ शहानवाज नासीर खान याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली. शानू हा कुख्यात गुंड होता. त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध कारवाईदेखील केली होती. त्याला महिनाभरापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटेवर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानूचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर, ईद साजरी करण्यासाठी शानू घरी परतला तो आज सकाळी दुचाकीने जातना दिसताच त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील अर्शद शेख याने पाठलाग करून त्याला गांधी गेटजवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही तेथे भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला. याप्रकरणी आरोपी सौरभ घाटे आणि अर्शद या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.