शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

बहिणीच्या प्रियकराची हत्या

By admin | Updated: May 4, 2017 01:54 IST

अजनीच्या आंबेडकरनगरात एका युवकाने वडील आणि साथीदारांच्या मदतीने आपल्या विवाहित बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना घडली.

दोन मित्र जखमी : पिता-पुत्रासह पाच जणांना अटक नागपूर : अजनीच्या आंबेडकरनगरात एका युवकाने वडील आणि साथीदारांच्या मदतीने आपल्या विवाहित बहिणीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना घडली. या घटनेत मृताचे दोन मित्रही जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे वस्तीत तणावाचे वातावरण असून पोलिसांनी पिता-पुत्रासह पाच आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत बंटी सुखदेवे, त्याचे वडील मनोहर सुखदेवे, नयन इलमकर, अमोल शेंडे, योगेश उके यांचा समावेश आहे. हल्ल्यात मृत झालेल्यात पंकज रवींद्र पाटील (३०) याचा तर जखमीत स्वप्निल पाटील (२६) आंबेडकर नगर आणि पलाश वर्मा (३०) रामेश्वरी यांचा समावेश आहे. पंकज पाटील आॅटो चालवितो. खुनाचा सूत्रधार बंटी सुखदेवे त्याच्या शेजारी राहतो. पंकजच्या आईच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाचे बंटीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. दीड वर्षापूर्वी बंटीच्या बहिणीचे अमरावतीत लग्न झाले. तिच्या लग्नामुळे पंकजला दु:ख झाले. त्याने १७ जून २०१६ रोजी बंटीच्या घरासमोर गोंधळ घातला होता. बंटीच्या बहिणीवर धोका दिल्याचा आरोप लावून त्याने धमकी दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पंकजविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद आणखीनच वाढला. बंटीची बहीण प्रसूतीसाठी माहेरी आली होती. मंगळवारी बंटीच्या घरी नामकरण विधी होता. मंगळवारी रात्री अमरावती मार्गावर बंटीच्या जावयाच्या कारवर हल्ला करून कारच्या काचा फोडण्यात आल्या. बंटीला यात पंकजचा हात असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. नामकरण समारंभासाठी आलेले पाहुणे गेल्यानंतर रात्री १०.४५ वाजता बंटी, त्याचे वडील मनोहर सुखदेवे, साथीदार नयन इलमकर, अमोल शेंडे, योगेश यांनी पंकजवर हल्ला केला. त्यांनी पंकजला घराजवळच घेरले. पंकजसोबत स्वप्निल आणि पलाश होते. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी तिघांनाही घेरून त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी पंकजच्या छातीत चाकू खुपसला. तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेमुळे वस्तीत खळबळ उडाली. तिघांनाही मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तपास ठाणेदार शैलेश शंखे, सहायक पोलीस निरीक्षक धोबे करीत आहेत.(प्रतिनिधी)