शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून हत्या, आरोपींची जन्मठेप कायम

By admin | Updated: December 30, 2016 02:31 IST

चारित्र्यहीन पत्नी व तिच्या प्रियकराची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

हायकोर्ट : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले नागपूर : चारित्र्यहीन पत्नी व तिच्या प्रियकराची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शीला रवींद्र निब्रड (२८) व राजू मारोती वासेकर (२८) अशी आरोपींची नावे असून ते कृष्णापूर, ता. वणी येथील रहिवासी आहेत. आरोपी शीलाला दोन मुले आहेत. एक मुलगा घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. ही घटना २२ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या रात्रीची आहे. भोजन झाल्यानंतर मयत रवींद्र व मुले झोपायला गेली. दरम्यान, शीला घराबाहेर गेली. काही वेळानंतर ती आरोपी राजूसोबत घरात आली. शीलाने रवींद्रच्या चेहऱ्यावर काळी चादर टाकली व राजूने धारदार चाकूने रवींद्रला भोसकले. परिणामी रवींद्रचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी रवींद्रचा मृतदेह उचलून घराबाहेर ठेवला. शीलाने आरडाओरड करून अज्ञात व्यक्तीने रवींद्रची हत्या केल्याचे चित्र निर्माण केला. परंतु, आरोपींचा गुन्हा जास्त काळ लपला नाही. मुलाच्या बयानामुळे आरोपींचा भंडाफोड झाला. आरोपींनी मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घटनेची माहिती कोणालाही सांगू नको असे बजावले होते. २९ नोव्हेंबर २०१४ रोजी केळापूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास यासह विविध कलमांतर्गत विविध शिक्षा सुनावली. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. शिरपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपींतर्फे अ‍ॅड. आर. डी. धांडे तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)