शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

कॉन्ट्रॅक्टरची हत्या - चौघांना अटक : जगदंबा हाईटस्मध्ये थरार

By admin | Updated: June 27, 2015 03:06 IST

सशस्त्र टोळक्याने गिट्टीखदानमधील एका बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरची निर्घृण हत्या केली. मदतीला धावलेल्या त्याच्या मित्रालाही जबर जखमी केले.

नागपूर : सशस्त्र टोळक्याने गिट्टीखदानमधील एका बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरची निर्घृण हत्या केली. मदतीला धावलेल्या त्याच्या मित्रालाही जबर जखमी केले. मानकापूर चौकाजवळच्या जगदंबा हाईटस् या इमारतीतील व्यापारी गाळ्यात शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोहित मार्टिन पीटर (वय २२) असे मृताचे तर, मिखिल मायकल फ्रान्सिस (वय १८) असे जखमीचे नाव आहे.मोहितच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रात्री सूत्रधारासह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तंबी बबलू गॅब्रियल, पम्मी, ब्रायन बॅस्टियन आणि मॅडी ऊर्फ आशिष राठोड अशी त्यांची नावे आहेत. मॅडी हाच या हत्येचा सूत्रधार असून, त्याने एका भूमाफियाच्या संमतीने मोहितच्या हत्येचा कट रचल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे. जमिनीवरील कब्जा आणि लाखोंची वसुली तसेच जुगार क्लबसारख्या अवैध धंद्यातील वर्चस्वातून तंबी, ब्रायन आणि साथीदारांना सुपारी देऊन मोहितचा गेम करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मर्लिन बिल्डिंग मटेरियल सप्लायर नावाने मोहितचे आॅफिस आहे. शुक्रवारी तो आणि त्याचा मित्र मिखिल आॅफिसमध्ये बसून होते. तेवढ्यात १० ते १५ जणांचे टोळके आरडाओरड करीत इमारतीत शिरले. त्यापैकी ५ ते ७ बुरखाधारी हल्लेखोरांनी मोहितच्या आॅफिसमध्ये शिरून त्याच्यावर घातक शस्त्राचे घाव घातले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नातील मिखिल याला मागे ओढत त्याच्याही पाठीवर हल्लेखोरांनी शस्त्र चालविले. डोके, गळा, मान, छातीवर धारदार शस्त्रांचे घाव बसल्यामुळे मोहित जागीच ठार झाला तर, पाठीवर घाव बसल्यामुळे मिखिलही खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मोहित ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर आरडाओरड करीत हल्लेखोर पळून गेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. अल्पावधीतच घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. माहिती कळताच गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक ए.जी. त्रिपाठी, एपीआय भेदोडकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. खास मित्र बनले पक्के वैरी आरोपी तंबी जरीपटक्यात अवैध दारू विक्री करतो. दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी त्याची मोठ्या प्रमाणात दारू पकडली. मोहितचा भाऊ मिथून याने टीप दिल्यामुळेच पोलिसांनी दारू पकडली, असा तंबीला संशय होता. त्यामुळे त्याने त्यावेळी मिथूनशी जोरदार भांडण केले. मोठ्या भावाशी वाद झाल्याचे कळाल्यामुळे मोहितने तंबीच्या कानशिलात लगावली होती. हत्येमागे हे कारण असेल तर तंबीसोबत १० ते १५ जणांचे टोळके कशासाठी होते, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. मृत मोहित आणि आरोपी तंबी तसेच ब्रायन हे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत जीवाभावाचे मित्र होते. काही महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला चढवला होता. त्यात मोहित, तंबी आणि ब्रायन या तिघांना पोलिसांनी कोठडीत टाकले होते. काही दिवसांची जेलयात्रा करून परतल्यानंतर त्यांचा याराना अधिकच घट्ट झाला होता. खाणेपिणे, उठणे-बसणे सोबतच करायचे. मात्र, एका तरुणीवरून त्यांच्यात दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यातील कटुता वाढत गेली. ती या स्तरापर्यंत जाईल, असा त्यांच्या कुटुंबीयांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. जुगार क्लबची ठिणगी मोहितच्या हत्येत नाव आलेला आरोपी ब्रायन उपराजधानीतील एका कुख्यात गुंडाचा मानलेला ‘भांजा’ आहे. तो आणि नुकताच पोलिसांनी कारागृहात डांबलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराची जुगार क्लबमध्ये भागीदारी होती. या क्लबमधून काही दिवसांपूर्वी एका गुंडाचा मिथून आणि मोहितसोबत वादही झाला होता. तो चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे एका ‘भाई’ने ‘मांडवली’साठी दोघांनाही आमनेसामने बसवले होते. त्यावेळी ब्रायनने भाईसोबत गले मिलन केले. मात्र, त्याच्या मनातील सूडभावना कमी झाली नव्हती, हे आता उघड झाले आहे.