शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तडीपार गुंडाने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:06 IST

सक्करदऱ्यातील कुख्यात आणि तडीपार गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २४) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी परिसरात राहणाऱ्या गौरव विनोद खडतकर (वय २८) या तरुणाची निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देआरोपीच्या घरावर जमाव चालून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात आणि तडीपार गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २४) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी परिसरात राहणाऱ्या गौरव विनोद खडतकर (वय २८) या तरुणाची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने मुख्य आरोपी कार्तिक उमेश चौबे यांच्या घरावर हल्ला चढवून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच मोठा पोलीस ताफा तेथे पोहोचला. त्यामुळे आरोपीचे घर वाचले.गौरव खडतकर हा सोमवारी क्वॉर्टर परिसरात राहत होता. गौरव काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीत सक्रिय होता. मात्र त्याने अलीकडे गुन्हेगारी सोडली होती. या भागात त्याचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे कुख्यात कार्तिक याला तो अडसर वाटत होता. कार्तिक चौबेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आले होते. मात्र पोलिसांची नजर चुकवून तो नागपुरातच राहत होता आणि गुन्हेगारीतही सक्रिय होता.सोमवारी मध्यरात्री आरोपी कार्तिक चौबे, शहबाज उर्फ बाबू मुस्तफा खान, राजा उर्फ साहिल शेख बाबा, मृणाल गिरीश भापकर यांनी गौरवला गाठले. सर्व आरोपी दारूच्या नशेत चूर होते. त्यांनी गौरवला शाहू गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ नेले. तेथे त्याच्याशी वाद घालून रोफ्टर, दगड, फरची आणि लोखंडी हँडलने गौरववर हल्ला चढवला. त्याला ठार मारल्यानंतर आरोपी परिसरात दहशत पसरवू लागले. ते पाहून जमाव संतप्त झाला. त्यांनी आरोपींवर धाव घेतली. आरोपी कार्तिकच्या घरावर हल्ला करून जमावाने तोडफोड केली. जमाव त्याचे घरही पेटवून देण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच वेळी सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला आणि त्यांनी जमावाला आवरले. या हत्याकांडानंतर सक्करदरा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.

 

टॅग्स :Murderखून