शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

हत्याकांडातील फरार कैदी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:04 IST

सात वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला पकडण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले. कमलेश मोतीराम राठोड (वय ३९) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देसंचित रजेवरून आल्यानंतर फरार : सात वर्षांपासून पोलिसांसोबत लपवाछपवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला पकडण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले. कमलेश मोतीराम राठोड (वय ३९) असे त्याचे नाव आहे.मूळचा दाभा तांडा येथील रहिवासी असलेला राठोड एका हत्या प्रकरणातील आरोपी असून, त्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. २०११ मध्ये तो संचित रजेवर एक महिन्यासाठी कारागृहाबाहेर आला होता. रजा संपल्यानंतर त्याला कारागृहात परत जायचे होते. मात्र, तो फरार झाला. त्याचा इकडे तिकडे शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे त्याला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०१३ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस त्याचा शोध घेतच होते. गेल्या काही दिवसांपासून तो खापरी पुनर्वसन परिसरातील कांबळे यांच्या घरी भाड्याने राहत असल्याचे हिंगणा पोलिसांना कळले. फरारीच्या काळात त्याने सुनिता नामक महिलेशी लग्न केले. तिला त्याच्यापासून चार वर्षांचा एक मुलगा आहे. आरोपी राठोडने स्वत:चे नाव बदलवून सचिन रामदास वरगट ठेवले होते. तो मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजीत नोकरी करीत होता. सोमवारी हिंगणा पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. नंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सुनील भांडेगावकर, हवलदार विनोद कांबळे, नायक विशाल भैसारे, नीलेश वासनकर, विनोद कांबळे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :PrisonतुरुंगArrestअटक