सत्र न्यायालयाचा निकाल : कस्तुरबानगर येथील घटना नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबानगर भागाबाई ले-आऊट येथे भावाच्या सासऱ्याला चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने शुक्रवारी आरोपी चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अन्य दोघांची खुनाची चिथावणी देण्याच्या आरोपातून सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका करण्यात आली. आनंद प्रकाश आडताणी (३२),असे आरोपी सीएचे नाव असून तो कस्तुरबानगर भागाबाई ले-आऊट येथील रहिवासी आहे. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये सूरज प्रकाश आडताणी(३४) आणि त्याची आई मधू प्रकाश आडताणी यांचा समावेश आहे. रमेश गोविंदराम चांदी (५५), असे मृताचे नाव होते. ते जरीपटका भागातील पॉवर ग्रीडजवळील कल्पनानगर देविका विहार येथील रहिवासी होते आणि सूरज आडताणी याचे सासरे होते. खुनाची घटना २१ एप्रिल २०१३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, रमेश चांदी यांनी २५ मे २०१० रोजी आपली मुलगी कंचन हिचा विवाह सूरज आडताणी याच्यासोबत करून दिला होता. सासरी नांदायला गेल्यापासून सासरची मंडळी कंचनचा मानसिक व शारीरिक छळ करायचे. कंचनची सासू मधू ही अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची असूनही कंचनसोबत सतत भांडण करून शिवीगाळ करायची. कुटुंबातील सारेच मधूलाच पाठिंबा द्यायचे. छळाला कंटाळून कंचन सात-आठ वेळा आपल्या माहेरी निघून गेली होती. घटनेच्या १५ दिवशांपूर्वी कंचन रागाने माहेरी निघून गेली होती.
खून खटल्यात ‘सीए’ला जन्मठेप
By admin | Updated: October 15, 2016 03:10 IST