नागपूर : इयत्ता बारावीच्या निकालात महापालिकेच्या शाळांनीही बाजी मारली आहे. ९२.५0 टक्के निकाल लागला असून, २७५ विद्यार्थ्यांपैकी २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला निकाल लागला आहे विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.६0 टक्के निकाल लागला आहे. या विभागातील १४0 पैकी १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला विभागाचा ९२.३७ टक्के निकाल लागला असून, ८७ पैकी ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य विभागाचा ७७.१७ टक्के निकाल लागला असून, ४८ पैकी ३७ विद्याथीं उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे ७६ पैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साने गुरुजी उर्दू शाळेच्या कला विभागातील २८ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एम.ए.के.आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सर्वच्यासर्व ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला विभागातील ४३ पैकी ४0 तर वाणिज्य विभागातील २४ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ताजाबाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या विज्ञान शाखेच्या ३७ पैकी ३६, कला विभागाच्या १६ पैकी १४ तर वाणिज्य शाखेच्या २४ पैकी २0 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली. दहावी-बारावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर, उपमहापौर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करतात. परंतु यंदा पदाधिकार्यांना याचा विसर पडला. (प्रतिनिधी
मनपा शाळा आघाडीवर..
By admin | Updated: June 3, 2014 02:50 IST