शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची तिजोरी रिकामी

By admin | Updated: April 16, 2017 01:46 IST

शहराचा विस्तार प्रचंड वेगाने होतोय. याच वेगाने विकासकामे करायची तर मनपाच्या रिकाम्या तिजोरीचे मोठे आव्हान समोर आहे.

महापौरांची कबुली : वरुड परिसर मित्र परिवारातर्फे सत्कारनागपूर : शहराचा विस्तार प्रचंड वेगाने होतोय. याच वेगाने विकासकामे करायची तर मनपाच्या रिकाम्या तिजोरीचे मोठे आव्हान समोर आहे. त्यामुळे पुढच्या काळात सामाजिक संस्थांची मदत घेऊनच मार्गक्रमण करावे लागेल, असे मत महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. वरुड परिसर मित्र परिवार, नागपूरतर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रभाषा संकुलात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे माजी महापौर कृष्णराव पांडव, प्रमुख अतिथी कृष्णा इन्स्टियूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी यांच्यासह शरद जिचकार, माधव देशपांडे, कमलेश राठी व अनिल वरेकर मंचावर उपस्थित होते. महापौर पुढे म्हणाल्या, घरच्यांनी केलेला हा सत्कार स्वीकारून मला मनस्वी आनंद झाला आहे. पण, मी अजून सत्कार स्वीकारण्याइतके कुठलेही कार्य केलेले नाही. त्यामुळे म्हणायचेच असेल तर याला अभिनंदन सोहळा म्हणा. महापौरपदासोबतच एक मोठी जबाबदारी माझ्या शिरी आली आहे. पण, मी एकटी कितीही प्रयत्न केले तरी काही करू शकणार नाही. शहराला खरेच सुंदर व समृद्ध करायचे असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड ही गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. त्या आपल्या गुणवत्तेने या शहराला सर्वांगसुंदर करतील याचा मला विश्वास आहे. कृष्णराव पांडव यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांच्या क्षमता ओळखून त्यांना राजकारणात मोठ्या पदावर संधी दिली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी, संचालन डॉ. प्रदीप विटाळकर तर आभार माधव देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)