शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक !

By admin | Updated: August 9, 2015 02:28 IST

राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाची तयारी सुरू : १२ रोजी प्रभाग रचनेवर मंथन नागपूर : राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. मात्र, एका प्रभागात किती वॉर्डांचा समावेश केला जाईल, यावर अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने नागपूरसह कोकण, पुणे, अमरावती, औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून तयारीच्या आढाव्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांच्यातर्फे ७ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांच्या नावे पत्र पाठविण्यात आले आहे. २०१६-१७ मध्ये १० महापालिका, १९५ नगर परिषद- नगर पंचायत, २६ जिल्हा परिषद तसेच २९७ पंचायत समित्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल. निवडणूक तयारीबाबत पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. बैठकीत सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांशिवाय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महापालिका कार्यालय, एमएसडब्ल्यूएएन हेल्पडेस्क, नवीन प्रशासनिक भवन मंत्रालयाचे कार्यालय जोडले जाईल. बैठकीत विभागीय आयुक्तांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीचे काम पाहणारे उपायुक्त उपस्थित राहतील. संबंधित महापालिकांचे आयुक्त, निवडणूक काम पाहणारे उपायुक्तही उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)महाआॅनलाईनच्या सॉफ्टवेअरच्याआधारावर प्रभाग रचनाडिसेंबर २०१६ पासून मार्च २०१७ दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यांची प्रभाग रचना महाआॅनलाईनतर्फे विकसित सॉफ्टवेअरच्या आधारावर केली जाईल. २०११ च्या गुगल मॅपच्या आधारावर जनगणना प्रगणक गट तयार करून ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत महाआॅनलाईनकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवायची आहे. त्यानंतरच प्रभाग रचना कशी असेल हे स्पष्ट होईल. वॉर्डपद्धतीचा अपेक्षाभंगगोंदिया-भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याचा भाजपने जोरदार धसका घेतला. यामुळेच आता वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा घेतलेला निर्णय बाजूला ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे समर्थन करीत आहेत. त्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविल्या आहेत. वॉर्ड आधारावर निवडणूक झाली तर अपक्षांना फायदा होतो. मात्र प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर अनेकांचा अपेक्षाभंग होणार आहे.