नागपूर : राज्य सरकारने तत्परता दाखवीत महापालिकेला सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये मंजूर केले. आता आणखी ६८ कोटी महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच सरकारची मंजुरी मिळेल, अशी शक्यता आहे. यात रस्ते विकासासाठी पेट्रोल सेसच्या रूपात वसूल केलेले ५४ कोटी व मलेरिया-फायलेरियाचे थकीत असलेल्या १४ कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीबाबत गेल्या डिसेंबरपासून बऱ्याचदा महापौर प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आता संबंधित प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आहे. ही रक्कम मिळाल्यास एलबीटी रद्द झाल्यानंतरही महापालिकेला आर्थिक झळ बसणार नाही, असा दावा दटके यांनी केला. (प्रतिनिधी)जकातीवर आधारित अनुदानाची मागणी२००१२-१३ मध्ये महापालिकेत जकात लागू होती. त्यावेळी दरवर्षी उत्पन्नात सुमारे १७ टक्के वाढ होती. या आधारावर राज्य सरकारकडे दरमहा ६० कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. याबाबत राज्य सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे.
मनपाला आणखी मिळणार ६८ कोटी
By admin | Updated: June 4, 2015 02:37 IST