शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सिटी बसेस चालवतेय की जनतेला छळतेय?

By admin | Updated: April 18, 2017 01:35 IST

नागपूर महानगरपालिका (मनपा) ज्या पद्धतीने सिटी बसेसचे संचालन करते आहे, ते पाहता मनपा सिटी बसेस चालवते आहे की जनतेला छळते आहे,....

शहरात ३०८ बसेस; पण त्यापैकी ९५ जागेवरच उभ्या : डिम्टस कंडक्टर पुरवायला अनुत्सुकसोपान पांढरीपांडे नागपूरनागपूर महानगरपालिका (मनपा) ज्या पद्धतीने सिटी बसेसचे संचालन करते आहे, ते पाहता मनपा सिटी बसेस चालवते आहे की जनतेला छळते आहे, असा लाखमोलाचा प्रश्न उभा झाला आहे.याचे कारण म्हणजे शहर बस चालविण्याचे कंत्राट मिळालेल्या तीन कंत्राटदारांकडे सध्या एकूण ३०८ बसेस रस्त्यावर धावायला तयार आहेत, परंतु मनपाच्या हलगर्जीपणामुळे त्यापैकी तब्बल ९५ बसेस जागेवरच उभ्या आहेत. मनपाची प्रतिनिधी असलेली दिल्ली इंटीग्रेटेड मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टिम (डिम्टस) ही कंपनी आवश्यक तेवढे कंडक्टर्स उपलब्ध करण्यासाठी अनुत्सुक आहे, म्हणून या बसेस उभ्या आहेत.सिटी बसेसचे कंत्राटदारगेल्या डिसेंबरमध्ये मनपाने सिटी बसेस चालविण्याचे कंत्राट तीन कंपन्यांना दिले आहे. त्यामध्ये हंसा सिटी बस नागपूर प्रा. लि., नागपूर, ट्रॅव्हल टाईम कार रेन्टल प्रा. लि. पुणे व आरके सिटी बस नागपूर प्रा. लि. दिल्ली यांचा समावेश आहे. मनपाने जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (जेएनयूआरएम) अंतर्गत एकूण २४० बसेस घेतल्या होत्या. त्यापैकी २३७ बसेस मनपाने या तीन कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या आहेत. याशिवाय या तीनही कंपन्यांना स्वत:च्या प्रत्येकी ६५ बसेस खरेदी करून सिटी बस म्हणून चालवायच्या आहेत. ही व्यवस्था पूर्ण झाल्यावर शहरात एकूण ४३२ सिटी बसेस उपलब्ध होणार आहेत. या कंत्राटदारांना मनपाकडून मोठ्या बससाठी ४९, मिडी बससाठी ४५ व मिनी बससाठी ३५ प्रति किलोमीटर भाडे मिळणार आहे.डिम्टसची जबाबदारीसिटी बस सेवेतून तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल गोळा करण्यासाठी मनपाने स्वत:ची प्रतिनिधी म्हणून डिम्टस या कंपनीची नेमणूक केली आहे. या कराराअंतर्गत डिम्टसला या सर्व बसेससाठी ९२० तिकीट मशिन्स व कंडक्टर पुरवायचे आहेत. ड्रायव्हर याच सिटी बसच्या कंत्राटदाराचा राहील आणि इथेच खरी गोम आहे. कंडक्टरला पगार द्यावा लागतो म्हणून डिम्टस ते पुरवायला उत्सुक नाही व त्यासाठी मनपा कुठलीही कारवाई करीत नाही. आज तारखेला हंसा सिटी बसजवळ एकूण १०५ बसेस आहेत. त्यातील केवळ७० रस्त्यावर धावत आहेत व हंसाच्या तब्बल ३५ बसेस उभ्या आहेत. अशाच प्रकारे आरके ट्रॅव्हल्सच्या ९८ पैकी फक्त ६० बसेस रस्त्यावर आहेत तर ३८ बसेस उभ्या आहेत व ट्रॅव्हल टाईमच्या १०५ पैकी ८३ बसेस सिटी बस म्हणून चालत आहेत व २२ बसेस उभ्या आहेत.डिम्टसकडून आम्हाला आवश्यक तेवढे कंडक्टर्स व मशीन उपलब्ध होत नाहीत म्हणून आमच्या बसेस उभ्या आहेत असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.याबाबत मनपाचे परिवहन व्यवस्थापक, शिवाजीराव जपताप यांना विचारले असता ‘‘मेट्रो रेल्वे व बसच्या एकत्रित तिकिटासाठी लागणाऱ्या ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ स्वीकारणाऱ्या मशिन्स आम्हाला घ्यायच्या आहेत त्यासाठी आम्ही वाट पाहतो आहे’’ असे अजब उत्तर मिळाले.डिम्टसचे सीईओ अमित हितकारी यांनी दिल्लीहून सांगितले की डिम्टस जवळ बसेसच्या संख्येपेक्षा जास्त तिकीट मशिन्स व कंडक्टर उपलब्ध आहेत.परंतु मेट्रो रेल्वेला धावायला अजून दोन वर्षे आहेत तोपर्यंत तुम्ही नागरिकांना सिटी बसपासून दूर ठेवणार का? जर मशिन्स व कंडक्टर्सचा तुटवडा नसेल तर बसेस जागेवर उभ्या कां? या दोनही प्रश्नांची उत्तरे जगताप आणि हितकारी यांच्याजवळ नव्हती.