शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घर पडल्यास मनपा जबाबदार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:04 IST

कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.

ठळक मुद्दे नोटीस जारी करून जबाबदारी झटकली : घरमालकाने करावे स्ट्रक्चरल ऑडिट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.संबंधित जीर्ण इमारतीच्या आसपास राहणारे नागरिक आणि त्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, घर जीर्ण झाल्याची माहिती झाल्यानंतरही कारवाई होत नसेल तर त्याकरिता जबाबदार कोण, असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहे. जीर्ण आणि जुन्या इमारतींना पाडण्याचे काम मनपाचे अतिक्रमणविरोधी पथक करीत असल्याचे मनपाने जारी केलेल्या बयाणात म्हटले आहे. त्यानंतरही घरमालकाला स्वत:च्या इमारतींचे वेळोवळी सुरक्षा आॅडिट करणे आवश्यक आहे. इमारतीची सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम-२६५ अंतर्गत प्रत्येक घरमालकाची आहे. त्या अंतर्गत विशेतज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून तपासणी करणे अनिवार्य आहे.कोणत्याही इमारतीचा हिस्सा जीर्ण असल्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयाला देण्याचे मनपाने म्हटले आहे. मनपा संबंधित प्रकरणी घर मालकाला नोटीस देईल. त्यानंतर त्या घरी कुणी राहात असेल आणि घर पडण्याच्या घटनेत कुणी सापडत असेल तर त्याकरिता मनपा जबाबदार नाही. जीर्ण इमारतींचे निरीक्षण करून मनपाचे अधिकारी काही सूचना करतील. घराच्या जीर्ण भागाच्या दुरुस्तीसाठी मनपाची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर सुधारणा करता येईल.पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. जन आणि धन हानी टाळण्यासाठी मदत करावी, असे मनपाने म्हटने आहे, पण जीर्ण घर पडल्यामुळे कुणी व्यक्ती जखमी वा मृत होत असेल तर मनपाची जबाबदारी काय राहील आणि दोषी घरमालकावर काय कारवाई करण्यात येईल, हे मनपाने जारी केलेल्या बयाणात सांगितलेले नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका