शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मनपा : महापौर तिवारी व उपमहापौर धावडे यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 21:41 IST

Mayor Tiwari and Deputy Mayor Dhawade took charge, nagpur news नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देशहर विकासाच्या स्वप्नाला गती देण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, मावळते महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,प्रतोद दिव्या धुरडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे,डॉ. मिलिंद माने, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये .तिवारी यांच्या वयोवृध्द मातोश्री शारदा, यांच्यासह कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.

संदीप जोशी यांनी नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांचे तुळशीरोप देऊन स्वागत केले व पदभार सोपविला.             केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांच्या शहर विकासाच्या स्वप्नाला गती देण्यार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. संदीप जोशी म्हणाले, महापौरपद स्वीकारताना आलेल्या अडचणीत, समस्यांमध्ये व प्रत्येक प्रसंगी दयाशंकर तिवारी पूर्ण ताकदीने सोबत राहिले. आज ते महापौर म्हणून नियुक्त झाले. त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. शहराला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने सोबत आहोत.

दयाशंकर तिवारी यांनी अनेक संघर्ष पेलून इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आव्हाने पेलणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. त्यामुळे मनपाचे नेतृत्व करताना येणारे प्रत्येक आव्हान ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौर-उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. सूत्र संचालन नगरसेवक संजय बंगाले यांनी तर आभार संदीप जाधव यांनी मानले.

मुंढे बोलत होते राधाकृष्णन न बाेलता मारतात

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणतीही कामे केली नाही. ते नुसते मीडियाशी बोलत होते. वर्षभरात कोणतीही कामे झालेली नाही. आताचे आयुक्त राधाकृष्णन बी. हेही काही करत नाही. पण न बोलता ते मारतात असा टोला आमदार कष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून लावला. दयाशंकर तिवारी यांचा जनसंपर्क, स्वभाव आणि काम करण्याची शैलीवरून ते शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौर