शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:56 IST

नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमनपा जनजागृती करणार : सर्व प्रभागात श्रमदान चळवळ राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौरनंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.तत्पूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अभिजित बांगर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक सुनील अग्रवाल, लता काडगाये, राजकुमार साहू, अमर बागडे, वंदना यंगटवार, माधुरी ठाकरे, अभिरुची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राऊत, गणेश राठोड, सुभाष जयदेव, आरोग्याधिकारी डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.स्वच्छता ही सेवा ही मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार आहे. १८ सप्टेंबरला मोहिमेची सुरुवात सर्व प्रभागापासून करण्यात येईल. सर्व प्रभागामध्ये स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणारी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागामध्ये श्रमदान चळवळ करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना पुरस्कार दिला जाईल. गोळा केलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाद्वारे कारवाई केली जाईल. पहिल्यांदा गुन्हा केल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार व तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास २५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असेही महापौरांनी सांगितले.महापालिका मुख्यालय सर्वप्रथम प्लास्टिकमुक्त केले जाणार आहे. त्यानंतर सर्व झोन कार्यालये, मनपाचे दवाखााने, शाळा प्लास्टिकमुक्त केल्या जातील. कचरा विलगीकरणासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. कचरा संकलन करणाऱ्यांनी कचरा विलगीकरण न करता नेला तर त्यावर दंड आकारला जाईल, असा इशारा अभिजित बांगर यांनी दिला.मंगल कार्यालये, हॉटेल्स किंवा घरगुती कचऱ्यातून निघणारे फूड वेस्ट हे वेगळे संकलित करण्याची व्यवस्था असावी, या वेस्टपासून बायोसीएनजी निर्माण करता येईल. कचरा जाळण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. कचरा जाळण्यावर उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाने काय करावे, यासंदर्भात सूचना झोन सहायक आयुक्तांनी त्यांना द्याव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले.बैठकीला जयंत पाठक, लीना बुधे, अनसूया छाब्राणी, ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल उपस्थित होते.कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजरसर्व झोनमधील ज्या ठिकाणी कचरा जास्त जमा होतो, त्या ठिकाणांची यादी झोनल अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांमार्फत सादर करावी. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारी यंत्रणा ज्या ठिकाणी कमकुवत आहे., त्या ठिकाणी ती सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. ज्या ठिकाणी नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून किंवा उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाकडून कारवाई के ली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNanda Jichakarनंदा जिचकारMayorमहापौरMediaमाध्यमे