शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नागरिकच्या जागेवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय? हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:13 IST

गरजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंभीर दखल घेतली.

ठळक मुद्देसमिती स्थापन करण्यासाठी मागितली नावे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गरजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. तसेच, यासंदर्भात समिती स्थापन करण्याकरिता वैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची नावे सुचविण्याचे आदेश या प्रकरणातील सर्व पक्षकारांना दिले. ही समिती सर्वेक्षण करून सदर मागणी कशी अमलात आणता येईल यावर अहवाल सादर करेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.याविषयी नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे संस्थापक-सदस्य डॉ. बालचंद्र सुभेदार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तर अंबाझरी रोडवर असलेले नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय २०१० पासून बंद आहे. या रुग्णालयाला नागपूर सुधार प्रन्यासची जमीन लीजवर देण्यात आली आहे. ही जमीन निरुपयोगी पडून राहू नये यासाठी लीज करार कसा रद्द करता येईल याची नासुप्रने दोन महिन्यात चौकशी पूर्ण करावी, असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले.सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने काही डॉक्टरांनी १९७० मध्ये नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय ही संस्था स्थापना केली. २० ऑक्टोबर १९७८ रोजी नासुप्रने या संस्थेला रुग्णालय सुरू करण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावरील ५८४२.४८ चौरस मीटरचा भूखंड लीजवर दिला. २४ जुलै २००९ रोजी नासुप्रने लीज कराराचे नूतनीकरण करून लीजची मुदत ३१ मार्च २०३२ पर्यंत वाढवून दिली. दरम्यान, २०१० मध्ये रुग्णालय बंद पडले. हे रुग्णालय इतर इच्छुकांना चालवायला देण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. तसेच, संस्थादेखील रुग्णालयाला पुनरुज्जीवित करू शकली नाही. परिणामी, ती जमीन परत घेऊन तिचा जनहितासाठी उपयोग करावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.साईबाबा सेवा मंडळाला हवी जमीनगरजू रुग्णांकरिता रुग्णालय चालविण्यासाठी वर्धा रोडवरील साईबाबा सेवा मंडळाला ही जमीन हवी आहे. त्याकरिता मंडळाने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून त्यांचा उद्देश न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, आवश्यक आदेश जारी करण्याची विनंती केली. मंडळातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटल