शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मल्टी मॉडेल हब की जनावरांचे कुरण ? ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

लोकमत विशेष वसीम कुरेशी नागपूर : उपराजधानीत मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अ‍ॅड नागपूर (मिहान) ची सुरुवात ...

लोकमत विशेष

वसीम कुरेशी

नागपूर : उपराजधानीत मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अ‍ॅड नागपूर (मिहान) ची सुरुवात होऊन दहा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. गावांचे पुनर्वसनही झाले आहे. परंतु जनावरांची व्यवस्था अद्याप झालेली नाही. मिहानसाठी ज्या पाच गावांची जमीन घेण्यात आली, त्यांचे तबेले आतापर्यत येथेच असून जवळपास ३० हजार जनावरे मिहान परिसरात चरताना दिसतात.

मिहान परिसरातील कलकुही, तेल्हारा, दहेगावचे पुनर्वसन झाले आहे. परंतु शिवणगावचे अर्धेच पुनर्वसन झाले असून खापरीचे पुनर्वसन शिल्लक आहे. गावकऱ्यांच्या मते या गावातील नागरिकांचा शेती आणि दुग्ध उत्पादन हाच मुख्य व्यवसाय आहे. परंतु जनावरांसाठी काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे ते संकटात सापडले आहेत. स्थानिक रहिवासी व दुग्ध व्यवसाय करणारे संजय बोडे यांनी सांगितले की, पुनर्वसनाच्या अध्यादेशात जनावरांसाठी जागा देण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट (एमएडीसी) च्या अधिकाऱ्यांनी जनावरांच्या संख्येबाबत सर्वेसुद्धा केला आहे. त्यानंतर शंकरपूर व बेलतरोडी दरम्यान ४५ एकर शासकीय जागा ठरविण्यात आली. परंतु पुढे काहीच कारवाई करण्यात आली नाही. शिवणगाव येथील रहिवासी अमोल वानखेडे यांनी सांगितले की, गावकरी आता दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. गावाचे पुनर्वसन तर होईल परंतु जनावरांना त्यापासून वेगळे कसे ठेवता येईल. त्यांना कुठेही चरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य जागेचा पर्याय लवकर शोधणे गरजेचे आहे.

..........

जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

‘मिहान परिसरातील तबेले किंवा जनावरांना इतरत्र स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव एमएडीसी मुख्यालयात विचाराधीन आहे.’

-दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी, नागपूर

...............