शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

काँग्रेसमध्ये मुळक यांना सर्वाधिक मते

By admin | Updated: October 26, 2014 00:13 IST

कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. असे असले तरी पराभूत उमेदवारांमध्ये राज्यातून चौथ्या

विदर्भात प्रथम : पराभूत उमेदवारांमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावरनागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. असे असले तरी पराभूत उमेदवारांमध्ये राज्यातून चौथ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली. विदर्भातून काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार करता राजेंद्र मुळक हे अव्वलस्थानी असून त्यांना ८६,७५३ मते मिळाली.विदर्भातून काँग्रेस पक्षाचे १० उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अमित झनक, वीरेंद्र जगताप, गोपाल अग्रवाल यांचा समावेश आहे. तर शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, वसंत पुरके, राजेंद्र मुळक, सतीश चतुर्वेदी, सुबोध मोहिते, अनिस अहमद, दिलीप सानंदा, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, रामरतन राऊत, आनंदराव गेडाम, सुभाष धोटे, विजय खडसे, सुभाष कोरपे, अविनाश वारजूरकर, वामनराव कासावार, विकास ठाकरे, अनिरुद्ध देशमुख, राहुल ठाकरे, नरेशचंद्र ठाकरे, शेखर शेंडे हे पराभूत झाले. राज्यातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा विचार करता सर्वाधिक मते करवीर मतदारसंघातून पी. एन. पाटील यांनी १,६०,२८८ घेतले. सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण) ९६,९६१, हर्षवर्धन पाटील (इंदापूर) ९४,२२७ आणि चौथ्या क्रमांकाची ८६,७५३ मते कामठीतून राजेंद्र मुळक यांनी घेतली. विदर्भातील काँग्रेसच्या इतर उमेदवारांपैकी सुनील केदार यांनी ८४,६३०, अमर काळे यांनी ७५,८८६, अमित झनक यांनी ७०,९३९ मते घेतली. राजेंद्र मुळक हे पश्चिम नागपूर मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु, अखरेच्या क्षणी कामठी मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उतरले. केवळ १३ दिवसांच्या कालावधीत त्यांनी ८६ हजारांवर मते घेतली. ते पराभूत झाले असले तरी काँग्रेसमध्ये अव्वल ठरले आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातही मुळक ‘टॉप’विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघाचा विचार करता राजेंद्र मुळक हेच ‘टॉप’ची मते घेणारे काँग्रेसचे उमेदवार ठरले. राजेंद्र मुळक यांनी ८६,७५३ मते पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळविला. दुसऱ्या क्रमांकावर ८६,६३० मते घेत सुनील केदार (सावनेर) हे राहिले. ६०,०९८ मते घेत विकास ठाकरे (पश्चिम) हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नागपूर शहरातील काँग्रेस उमेदवारांचा विचार करता विकास ठाकरे यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेतली. जिल्ह्यात चवथ्या क्रमांकावर प्रफुल्ल गुडधे (५४,९७५), पाचव्या क्रमांकावर अभिजित वंजारी (५०,५२२), सहाव्या क्रमांकावर डॉ. नितीन राऊत (५०,४०२), सातव्या क्रमांकावर अनिस अहमद (४९,४५२), आठव्या क्रमांकावर सतीश चतुर्वेदी, नवव्या क्रमांकावर सुबोध मोहिते (३५,५४६), दहाव्या क्रमांकावर कुंदा राऊत (२०,५७३), अकराव्या क्रमांकावर संजय मेश्राम (१७,५६८) तर बाराव्या क्रमांकावर दिनेश ठाकरे (४,७७८) हे राहिले.