शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

‘मुजोर’ अधिकारी, हतबल सत्ताधारी! सलग चौथ्या दिवशी ‘आपली बस’ सेवा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:42 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्तापक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व परिवहन समितीचे सभापती यांनी केलेले प्रयत्नही अपुरे पडले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थी, प्रवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्तापक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व परिवहन समितीचे सभापती यांनी केलेले प्रयत्नही अपुरे पडले आहेत.महापालिकेचा वित्त विभाग तिजोरीत पैसे नसल्याचे कारण पुढे करून आपली जबाबदारी टाळत आहे. तीन रेड बस आॅपरेटरचे ४५ कोटी रु. थकीत असल्याने यांच्याकडे डिझेल भरण्यासाठी पैसे नाहीत. जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली सत्तेत आलेली भाजपा व नागरिकांचा खिसा खाली करणारी महापालिका नागरिकांना मूलभूत गरज असलेली परिवहन सेवा उपलब्ध करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे गेल्या शनिवारपासून ३२० बसेसची चाके थांबलेली आहेत.परिवहन विभागाला सापत्न वागणूक मिळत असल्याने या विभागाची अवस्था बिकट झाली आहे. स्थायी समितीने आपल्या अर्थसंकल्पात वित्त वर्षात परिवहन विभागासाठी १०८ कोटी देण्याची घोषणा केली आहे. तोटा भरून काढण्यासाठी दर महिन्याला परिवहन विभागाला नऊ कोटी मिळाले पाहिजेत. परंतु घोषणेनुसार निधी उपलब्ध करण्यात स्थायी समितीला अपयश आले आहे. परिवहन विभागाविषयी अनास्था असल्याने आज बससेवा बंद आहे. दुसरीकडे वीज, पाणी व कचरा यावर नियमित खर्च केला जात आहे. परंतु परिवहन विभागाचे बिल गेल्या चार महिन्यापासून थकीत आहे.प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे व वित्त विभागाचा प्रभार सांभाळत असलेले उपायुक्त नितीन कापडणीस यांची भूमिका बस बंद पडण्याला थेट कारणीभूत असल्याचे दिसते. शुक्रवारी आयबीटीएम आॅपरेटला ९० लाखाचे बिल देण्यात आले. परंतु शहर बस चालविणाऱ्या बस आॅपरेटरला गेल्या आठवड्यात बिल दिलेले नाही. नवीन आठवड्याला सुरुवात होऊन दोन दिवस झाले तरी तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेतलेला नाही. महापालिका प्रशासन व आॅपरेटर यांच्यात सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. आॅपरेटर्सनी प्रत्येकी दोन कोटी घेऊ न बस सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु महापालिकेच्या खात्यात रक्कम नसल्याने अडचण असल्याचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले.दररोज २० लाखांचे नुकसानबस बंद असल्याने परिवहन विभागाला तिकिटातून दररोज होणारे १८ ते २० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याने बस बंद ठेवण्याचा निर्णय आॅपरेटरने घेतला. मिळालेल्या माहितीनुसार बस आॅपरेटर्सकडे आॅईल कंपन्यांची ६५ लाखांहून अधिक थकबाकी आहे. दोन ते तीन दिवस क्रेडिटवर संबंधित कंपन्याकडून डिझेलचा पुरवठा केला जातो.नागरिकांना सेवा देण्यात मनपाला अपयशपरिवहन सेवा नफा कमावण्यासाठी नाही तर गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी चालविली जाते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत अनेकदा करून महापालिका अधिकाऱ्यांना बससेवा सुरळीत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी नफा कमावण्याचा विचार न करता शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याऐवजी बससेवा बंद ठेवली आहे....तर महापालिकेने दिवाळे घोषित करावेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सत्ता असूनही नागपूर शहराची अशी बिकट अवस्था असेल तर भविष्यात कोणती परिस्थिती निर्माण होईल, हे तर देवच जाणो, बस आॅपरेटरला थकबाकी न मिळाल्याने गेल्या चार दिवसापासून शहर बस बंद आहे. याची चर्चा आता राष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महापालिकेची अशी अवस्था असेल तर दुसऱ्या शहरांची कल्पना न केलेली बरी. सत्तेत आल्यानंतर महापालिका सांभाळता येत नसेल तर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महापालिका दिवाळखोरीत निघाल्याची घोषणा करावी.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते

 गेल्या शनिवारपासून आपली बस सेवा बंद असल्याने नागपूर शहर व परिसरात विद्यार्थी व प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्रस्त झालेले आहेत. आॅटोचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. दहा रुपयाऐवजी २० ते २५ रुपये वसूल करीत आहे. त्यातच बस स्थानकावर आॅटोची प्रतिक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत तर नोकरदारांना कार्यालयात पोहचायला उशिर होत आहे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी बस बंद असल्याने शाळा -महाविद्यालयात जाणे बंद केले आहे. 

आजपासून बस सेवा सुरळीत शहर बस सुरळीत सुरु व्हावी. यासाठी अखेर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मंगळवारी हस्तक्षेप केला. मिळालेल्या माहितीनुसार तोडगा काढण्यासाठी जोशी, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, उपायुक्त नितीन कापडणीस व आॅपरेटरचे प्रतिनिधी यांच्यात रात्रीपर्यंत बैठक सुरू होती. यात थकबाकीवर तोडगा काढण्यासाठी नवीन फार्मूल्यावर चर्चा झाली. त्यानुसार आॅपेरटला प्रत्येकी २ कोटी देण्यात येणार आहे त्यानंतर  २९सप्टेंबरला प्रत्येकी ५० लाख, ३ आॅक्टोबरला ५० लाख व ९ आॅक्टोबरला प्रत्येकी ५० लाख देण्यात येणार आहे.  त्यामुळे बुधवारपासून आपली बस सेवा पूर्ववत सुरू होणार आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक